google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायतींचा निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व नऊ गटविकास अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा निर्णय सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

Breaking News

ग्रामपंचायतींचा निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व नऊ गटविकास अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा निर्णय सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

 ग्रामपंचायतींचा निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व नऊ

गटविकास अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा निर्णय सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी 

सोलापूर जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातील विकास निधी वेळेत खर्च केला नाही.यामुळे या बावीस ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह पंचायत समितीच्या नऊ गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे देण्यात येणार आहे,

अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.यापूर्वीच शून्य व पन्नास टक्क्यांच्या आत खर्च असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत प्रशासन विभागाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

येत्या १३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्वामी हे सहविचार सभा घेणार आहेत.पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चावरून जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. निधी खर्चात मागे राहिलेल्या जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होणार आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा खर्च शून्य तर काही ग्रामपंचायतींचा खर्च ५० टक्क्यांच्या आत आहे. खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व गटविकास अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शेळकंदे यांनी सांगितले.

दि.१३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सहविचार सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे कारवाई संदर्भात निर्णय घेतील.

Post a Comment

0 Comments