google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान उमेदवारांनो ! सरपंचपद किंवा सदस्यासाठी सभा, बैठका, बॅनरबाजी करताय? अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार यांची परवानगी आवश्यक;

Breaking News

सावधान उमेदवारांनो ! सरपंचपद किंवा सदस्यासाठी सभा, बैठका, बॅनरबाजी करताय? अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार यांची परवानगी आवश्यक;

 सावधान उमेदवारांनो ! सरपंचपद किंवा सदस्यासाठी सभा, बैठका, बॅनरबाजी करताय?

अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार  यांची परवानगी आवश्यक;

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. सरपंचपद किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक शाखेकडून विविध नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर पोलिस प्रशासनाकडूनही निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

या नियम व अटीचे पालन न केल्यास किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार आहेत.

 या नियम व अटीचे पालन न केल्यास किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सरपंच व सदस्य पदांच्या उमेदवारांनी सर्व नियम, अटीचे पालन करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सुरू झाला आहे. ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, तेथे प्रचाराचा शुभारंभाचे कार्यक्रम होत आहेत. उमेदवार हे घरभेटीवर जास्त जोर देत आहे.

शिवाय प्रचारासाठी सोशल मीडियाचाही वापर वेगाने वाढला आहे. गावपातळीवर पक्षीयपेक्षा गावपातळीवरील राजकारण महत्त्वाचे ठरते. 

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी व विकास पॅनेल निर्माण केले जातात..जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका….सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. 

अर्ज दाखल करणे, छाननी, अर्ज माघार घेणे ही प्रक्रिया संपली असून प्रत्यक्ष प्रचार सुरु झाला आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती या ९, ११, १७ सदस्य संख्या असलेल्या आहेत. शिवाय लोकनियुक्त सरपंचपदासाठी स्वतंत्र उमेदवार आहे. १८ डिसेंबरला मतदान असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते…..

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बैंक खाते काढणे बंधनकारक आहे. शिवाय रोजच्या रोज खर्चाचा हिशोब निवडणूक शाखेकडे जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा निवडणूक शाखेच्या कारवाईला सामोरे जावे लागते. 

सरपंचपद व उमेदवारांना खर्चाची मर्यादा निवडणूक शाखेने घालून दिली आहे.निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, मतदान, मतमोजणी होईपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये.

 मतदानासाठी कोणत्याही प्रकारचे आमिष दाखविल्यास संबधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार असे पोलीस प्रशिक्षण कडून सांगण्यात आले.ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच व सदस्य पदांच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे.

 शिवाय प्रचार मतदान व मतमोजणी कालावधीत तहसील, पोलिस व निवडणूक शाखेकडून विविध नियम व अटीचे पालन केले जाईल असे लिहून घेण्यात आले आहे. कोणताही नियम मोडल्यास आमच्यावर कारवाई होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. -ग्रामपंचायत उमेदवार

सभा, बैठका, बॅनरसाठी परवानगी आवश्यक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा, बॅनर, कॉर्नर बैठका घेण्यात येतात. मात्र या सर्व बैठकांना तहसील, पोलीस व ग्रामसेवकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय नियम व अटीचा भंग झाल्यास कारवाई होईल.

Post a Comment

0 Comments