कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोल्यात थांबा मिळावा:- शहीद अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी)शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने
कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोल्यात थांबा द्यावा या मागणीचे निवेदन रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे यांना संघटनेच्या वतीने स्मरणपत्र क्रमांक 2 देण्यात आले आहे .
गाडी क्रमांक अप डाऊन 22155 & 22156 दैनंदिन कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आली आहे,
त्यामध्ये सांगोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही यापूर्वी या मार्गावर सोलापूर- मिरज एक्सप्रेस धावत होती कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून ही रेल्वे बंद होती रेल्वे विभागाने कामटे संघटनेची व येथील प्रवाशांची वाढती मागणी
पाहता थेट दररोज कलबुर्गी ते कोल्हापूर गाडी सुरू करून प्रवाशांची सोय केली आहे पण सांगोला थांबा दिलेला नाही ,सांगोला रेल्वे स्टेशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेशन आहे इथून या गाडीने हजारो प्रवासी प्रवास करू शकतील
यापूर्वी रेल्वे विभागाने सांगोल्यातून किसान रेल्वे सुरू करून शेतकऱ्यांची मोठी सोय केली होती त्याला प्रतिसाद म्हणून येथील शेतकरी व व्यापारी वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून विक्रमी/ उच्चांकी उत्पादन रेल्वे विभागास मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे
त्यामुळे सांगोला स्टेशनचे महत्त्व वाढलेले आहे, आटपाडी ,मंगळवेढा माळशिरस , कवठेमंकाळ जत या भागातील अनेक प्रवासी इथून सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी नोकरी व्यवसाय कामानिमित्त दररोज ये -जा करीत असतात
त्याकरिता सांगोला स्टेशनवर तात्काळ थांबा मंजूर करावा या मागणीचा विचार न केल्यास येथील नागरिकांसमवेत शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. असे निवेदन मध्य रेल्वे विभाग सोलापूर यांना देण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रती
खासदार .रणजीतसिंह नाईक -निंबाळकर,
खासदार .डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी,
जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे ,मुंबई. यांनाही देण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
चौकट:- शहीद अशोक कामटे संघटनेच्या माध्यमातून वारंवार कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वेस सांगोला अधिकृत थांबा मिळावा याकरिता संघटनेची निवेदने, स्मरण पत्रे प्राप्त झाली आहेत. पुढील कार्यवाहीसाठी सदर निवेदन वरिष्ठ कार्यालयास पाठवली आहेत व पाठवण्यात येणार आहे, या मागणीचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी केली जाईल.
*प्रदीप हिरडे ,वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक, सोलापूर*
0 Comments