google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला माण नदीतून विनापरवाना वाळू उपसा करणारे चार ब्रास वाळू अन् सात लाखांचा टिपर जप्त

Breaking News

सांगोला माण नदीतून विनापरवाना वाळू उपसा करणारे चार ब्रास वाळू अन् सात लाखांचा टिपर जप्त

 सांगोला माण नदीतून विनापरवाना वाळू उपसा करणारे चार ब्रास वाळू अन् सात लाखांचा टिपर जप्त

 सांगोला : सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माण नदीतून विनापरवाना वाळू उपसा करून चोरून वाहतूक करताना २० हजाराच्या ४ ब्रास वाळूसह ७ लाखाचा टिपर असा ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास कोपटेवस्ती, सांगोला येथील पप्पू देशमुख यांच्या घराजवळ केली.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चालक विजय ऊर्फ बंट्या प्रकाश हजारे (रा. वाढेगाव) व टिपर मालक धनाजी भाऊसो जानकर (रा. कोपटे वस्ती- सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलिस कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलिस नाईक गणेश बांगर, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे व इतर कर्मचारी २८ डिसेंबरला रात्री १०.३० वाजता सांगोला पोलिस स्टेशन हद्दीतपेट्रोलिंग करत होते. 

त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत कोपटे वस्ती शिवारात माण नदीपात्रातून काही इसम अवैध वाळूचा उपसा करून चोरून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

 त्या आधारे तेथे गेले असता एक टिपर माण नदीपात्रातून कोपटे वस्तीकडे येताना दिसला. तो टिपर चालकाने रस्त्यालगतच्या कोपटेवस्ती येथील संकेत ऊर्फ पप्पू देशमुख यांच्या घराजवळ रिकामी केली. यावेळी पोलिसांनी चालकास नाव विचारले असता त्याने विजय ऊर्फ बंट्या प्रकाश हजारे (वय २३, रा. वाढेगाव, ता. सांगोला) असे असल्याचे सांगितले. 

त्याच्याकडे कोणतीही रॉयल्टी अगर पावती अथवा पास परवाना नसल्याचेही त्याने सांगितले तर धनाजी भाऊसो जानकर यांच्या मालकीचा टिपर असल्याचे सांगितले. पोलिसांनी ७ लाखांचा एमएच १२ / पीक्यू २८०४ टिपरसह २० हजारांची ४ ब्रास वाळू ताब्यात घेऊन जप्त केली.

Post a Comment

0 Comments