google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला -चिनके चिठ्ठी निघेल त्या पार्टीला पहिली अडीच वर्षे सरपंचपद चिणके ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ११ जागांसाठी लागली निवडणूक

Breaking News

सांगोला -चिनके चिठ्ठी निघेल त्या पार्टीला पहिली अडीच वर्षे सरपंचपद चिणके ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ११ जागांसाठी लागली निवडणूक

सांगोला -चिनके चिठ्ठी निघेल त्या पार्टीला पहिली अडीच वर्षे सरपंचपद चिणके ग्रामपंचायत सदस्य पदाच्या ११ जागांसाठी लागली निवडणूक




चिणके तिन्ही पक्ष पार्टीत एकमत न झाल्याने ११ जागांसाठी निवडणूक लागली.त्यामुळे सिद्धनाथ विकास आघाडी

 सांगोला : चिणके ग्रामपंचायतीच्या ६५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एक वेळ वगळता शहाजी बापू पाटील  यांचेच वर्चस्व 'राहिले आहे. यंदा सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे जनतेतून निवडून द्यायच्या सरपंच पदांसाठी ज्या पक्षाच्या नावाने चिठ्ठी निघेल त्या पार्टीला पहिली अडीच वर्षे सरपंच, 

या फॉर्म्युल्यानुसार बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे नाथा दत्तात्रय खंडागळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. मात्र सदस्य पदाच्या इच्छुकांमधूनएकवेळ वगळता स्थापनेपासून ६५ वर्षे वर्चस्व माण नदीकाठावर वसलेल्या चिणके (ता. सांगोला) ग्रामपंचायतची स्थापना सन १९५७ मध्ये झाली. 

स्थापनेपासून ६५ वर्षे ग्रामपंचायतीवर एक वेळ वगळता आमदार शहाजी बापू पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. सुरुवातीला काँग्रेसचे कै. भानुदास पाटील यांना प्रथम सरपंच होण्याचा मान मिळाला. त्यानंतर कै. जगन्नाथ मिसाळ, कै. आगतराव मिसाळ, कै. ज्ञानू मिसाळ, के, शिवाजीराव मिसाळ, कै. यशवंत कोरे, विलास मिसाळ, 

बाळासाहेब कवठेकर, भीमराव कोळी, गोपाळ मिसाळ, रजनी कोरे यांना सरपंच पदाचा मान मिळाला. त्यानंतर सन २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या जनतेतून माधुरी मिसाळ यांना पहिल्या लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला.विरुद्ध जनता आघाडीमध्ये दुरंगी लढत होत आहे.

 यंदाच्या निवडणुकीसाठी सरपंचपद ओबीसी असल्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीयांची बैठक झाली. यावेळी चिठ्ठी टाकून सरपंचपद निवडीसाठी सर्वानुमते सहमती दर्शवली. 

त्यानुसार आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या चर्चेतून बाळासाहेबांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन चिठल्या पहिल्याअडीच वर्षांसाठी टाकल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या नावाने चिठ्ठी निघाल्याने नाथा दत्तात्रय खंडागळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली. 

मात्र सदस्य पदाच्या ११ जागांसाठी एकमत न झाल्यामुळे निवडणूक लागली. त्यामुळे ११ जागांसाठी बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी, शेकापप्रणीत सिद्धनाथ विकास आघाडी विरुद्ध जनता आघाडी अशी सरळ लढत होत आहे. तर एक अपक्षही सदस्य पदासाठी नशीब अजमावत आहे.

Post a Comment

0 Comments