google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साह संपन्न

Breaking News

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साह संपन्न

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साह संपन्न    

सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाची शैक्षणिक उत्साहात संपन्न झाली .

प्रशालेची सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षाची सहल प्रशालेचे मुख्याध्यापक  रमेश  पवार सर यांच्या नेतृत्वाखाली  आयोजन सहल प्रमुख  संतोष कुंभार सर यांनी केले.

२दिवस १ मुक्कामी शालेय सहल औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यातील  शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देऊन संपन्न झाली. सहलीची सुचना काढल्यानंतर विद्यार्थ्यांना सहलीचे वेध लागले.  विद्यार्थींनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.  रात्री १२ वाजता चालू झालेली सहल सकाळी शनिशिंगणापूर येथे शनि महाराजांच्या दर्शनासाठी पोहचली.

तेथे विद्यार्थांना शनिशिंगणापूर गावाचे वैशिष्ट्य तसेच शनि देवा विषयी माहिती मिळाली. यानंतर आमची सहल प्रवरा नदीकिनारी वसलेल्या देवगड येथील सुंदर दत्त मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पोहचली. दर्शन घेतल्यानंतर प्रवरा नदी किनाऱ्यावरच्या सुंदर दृश्याचा फोटो काढत आनंद लुटला. 

त्यानंतर ह्या  सहल यात्रेने औरंगाबाद च्या दिशेने कूच केली. औरंगाबाद येथे गेल्यानंतर सर्वात आगोदर बिबीच्या मकबऱ्याला भेट दिली.ती वास्तू पाहिल्यानंतर  विद्यार्थी समाधानी आणि फार आनंदी दिसत होते.आता दुपारची चाहूल लागली होती आणि सर्वांना जाम भूक लागली होती.

मग त्या मकबऱ्या जवळच्या एका हाॅटेल मध्ये सर्वांनी मनसोक्तपणे सोबत आणलेल्या शिदोरीवर ताव मारला. पुढे आम्ही औरंगाबाद विद्यापीठामधील सोनेरी महल - विभागीय वस्तू संग्रहालयाला भेट दिली.या वस्तू संग्रहालयामध्ये अनेक प्राचीन व दुर्मिळ वस्तू विद्यार्थ्यांना पाहता आल्या. त्यांना ऐतिहासिक वस्तू बद्दल माहिती मिळाली.

आता आमच्या सहलीचा  औरंगाबाद लेणी पाहण्यास उत्सुक होती.उंच आणि खड्या असणाऱ्या त्या पायऱ्या चढून जाणे अवघड वाटत होते.परंतू विद्यार्थ्यांचा उत्साह एवढा होता की आम्ही कधी तिथे पोहचलो हे समजले सुद्धा नाही.आता दिवस मावळू लागला होता.आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे होते.

जे तेथून जवळपास ३० किमी लांब होते.संध्याकाळी ७ वा. आम्ही आमच्या मुक्काम च्या ठिकाणी(वेरुळ)पोहचलो. तिथे विद्यार्थ्यांची उत्तम राहण्याची व रात्रीच्या जेवणाची सोय केली होती. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थी त्यांनी पाहिलेल्या स्थळांची तसेच उद्या पाहणार असलेल्या ठिकाणांची स्वप्ने रंगवत झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. आमच्या पुढील सहलीला सुरुवात झाली.तो वार होता शनिवार आणि आमच्या पासून अगदी १० किमी वर खुलताबाद हे ठिकाण होते आम्ही सकाळी- सकाळी तेथील भद्रा मारूतीचे दर्शन घेऊन प्रसादाचे आस्वाद घेतला.

आता पुढचा टप्पा किल्ले दौलताबाद (देवगिरी) होता. विद्यार्थ्यी पहिलेच उत्सुक होते. त्यांनी तिथे जाताच किल्ला चढण्यास सुरुवात केली.काही विद्यार्थी मधल्या टप्प्यावर थकले पण सर्व विद्यार्थी किल्ला चढले तो किल्ला चढून गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

किल्ला चढत असताना शिक्षक तसेच स्थानिक मार्गदर्शक किल्ल्याच्या विविध टप्प्यावर त्याचे महत्त्व व त्यासंबंधीचा इतिहास सांगितला. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला.  आता आमचे ध्येय वेरूळ लेणी होते.वेरूळला आम्ही साधारणपणे दुपारी २वा पोहचलो. 

तेथील सुंदर आणि भव्य कोरीव काम हे अलौकिक  पाहण्यासारखेच होते.आम्ही ज्याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो.तेआम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत होतो. तिथून निघण्याचे मन होत नव्हते पण नाइलाजाने आम्हाला प्रस्थान करणे गरजेचे होते. 

आम्ही शिर्डी च्या दिशेने प्रस्थान केले.साधारण एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही साईबाबाच्या नगरीत पोहचलो. तिथे आगोदर जेवणाची व्यवस्था केली व साईबाबांचे दर्शन घेतले.पुढे तिथेच दररोज भरणाऱ्या लहान यात्रेचा मुलांनी भरभरून आनंद लुटला.

 मुलांना आता नको वाटत असणाऱ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती.शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. आमची सहल पुन्हा शाळेवर परतली. शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा- श्रीमती कौशल्यादेवी शिंदे व संस्था सचिव श्री निलकंठ शिंदे सर यांनी ही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. 

सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन ही सहल यशस्वीरीत्या संपन्न केली. या सहली मध्ये या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना विविध अनुभव घेतले. शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या पर्यटन स्थळांबद्दल महिती मिळवली व सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.

Post a Comment

0 Comments