सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर सरपंच पदासाठी पाचेगाव व चिनके येथे बिनविरोध निवड
संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिनके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड अखेर बिनविरोध झाली. तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील व मा. आ. दिपकआबा
सांळुखे पाटील यांच्याआघाडीकडून बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान नाथा खंडागळे यांना मिळाला. पेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी नाथा खंडागळे व भीमा गोरखनाथ बनकर या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार डिसेंबर रोजी भीमा बजवलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आवा बापू गटाचे नाथा खंडागळे यांचा बिनविरोध सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चिनके ता. सांगोला हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते या गावात मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील आणि शहाजीबापू पाटील यांची मोठी ताकद आहे. एकमेकांत संघर्ष करून आपली ताकद व वेळ वाया घालवू नका असा मा. आम, दिपक आबा साळुंखे पाटील व शहाजीबापूंनी आपल्या कार्यकत्यांना सला दिला होता.
गावातील निवडणूक समन्वयाने व एकत्रित येऊन लडवा आणि त्यातून मार्ग काढा असा आदेश नेते मंडळींनी दिल्याने गावातील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित घेऊन गावाच्या सरपंच पदाचीतालुक्याच्या गतिमान विकासासाठी आमची आघाडी कटिबध्द
आमच्यासाठी चिनके हे राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे गाव आहे. या गावातील सर्वांनी आजवर आपणास भरभरून प्रेम आणि सहकार्य केले. आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शहाजीबापू पाटील आणि आमची आघाडी सदैव कटिबध्द आहे. नूतन सरपंच नाथा खंडागळे व सर्व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली चिनके गावाच्या विकासासाठी आवश्यक सर्व उपाययोजना आगामी काळात पूर्णत्वास नेऊ;
मा. आम. दिपकआबा साळंखे पाटीलनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने नाथा खंडागळे यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता उरली आहे.
नूतन बिनविरोध सरपंच नाथाखंडागळे आणि चिनके येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नूतन बिनविरोध सरपंचगावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
चिनके या गावाने सुरुवातीपासून आपल्यावर विशेष प्रेम केले आहे. आपल्या राजकीय प्रवासात नेहमीच या गावातील लोकांनी भरभरून सहकार्य केले आहे. म्हणून या गावातील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सूचना मी येथील कार्यकर्त्यांना केली होती.
त्यानुसार माझे जिवाभावाचे सहकारी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनीही निर्णायक भूमिका घेत ही निवडणूक बिनविरोध केली. चिनके गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात निधीची कमतरता भासू देणार नाही
आमदार शहाजीबापू पाटीलनाथा खंडागळे यांचा सत्कार केला. आणि भावी राजकीय -वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील माजी सरपंच विलास मिसाळ, माणिकमिसाळ, मोहन मिसाळ, दैवत शितोळे, महादेव खंडागळे, चेअरमन पांडुरंग मिसाळ, सीताराम जानकर, अमोल काटे, हणमंत इंगळे, डॉ. महेश मिसाळ आदीसह मान्यवर उपस्थित होते.
0 Comments