संतापजनक! १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक बलात्कार; परळ येथील घटना
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर अत्याचार मोठी वाढ झाली असून पोलिसांपुढे गुन्हेगारांना पकडण्याचा आवाहन उभे टाकले आहे.
तसेच समाजातील सर्व स्तरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईच्या लोअर परळ भागात दि.२३ डिसेंबर रोजी एका १५ वर्षीय तरुणीवर ६ जणांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले असून यातील ३ आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, जिथे सहाही जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे
या दुर्देवी मुलीला तिच्या मित्राने दुसऱ्या एका मित्राच्या घरी बोलावले. तिथे गेल्यानंतर पीडितेवर ६ आरोपींनी बलात्कार केला.
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने घरी धाव घेत आपल्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासांत ६ जणांना बेड्या ठोकल्या.
या पैकी ३ आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच उर्वरित तिघांना कोर्टात हजर करण्यात आले. या तीन आरोपींना कोर्टाने ३० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आहे


0 Comments