google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते..बापलेकांचा अपघात झाला..अन त्यात चार वर्षाच्या लेकरासह बापही देवाघरी गेला..!

Breaking News

गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते..बापलेकांचा अपघात झाला..अन त्यात चार वर्षाच्या लेकरासह बापही देवाघरी गेला..!

 गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते..बापलेकांचा अपघात    झाला..

अन त्यात चार वर्षाच्या लेकरासह बापही देवाघरी गेला..! 

ते अत्यंत आनंदाने गणपतीपुळ्याला, कोकणाच्या भेटीला निघाले होते. निघताना त्यांच्या मनात यत्किचिंतही अशी शंका आली नव्हती की, हा आपला अखेरचा दिवस आहे.. आपण देवाच्याच भेटीला निघालो आहोत, ते फक्त भूतलावरील नाही, तर देवाघरच्या देवाला.. हे थोडेही कळले नव्हते.. पण काळ आला.. अचानक आला.. अन चार वर्षाच्या लेकरासह बापही देवाघरी गेला.

गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघालेल्या इंदापूर तालुक्यातील भाविकांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला. हा अपघात कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड येथे झाला.

यात इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील महेंद्र अशोक घोगरे (वय 35 वर्षे), आरव महेंद्र घोगरे (वय 4, रा. बावडा, वकिलवस्ती,तालुका इंदापूर जि. पुणे) या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला.

वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकली आणि हा अपघात झाला. यामध्ये अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आज बावड्यात शोकाकुल स्थितीत बापलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments