google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ८२.६३ टक्के शांततेने मतदान झाले

Breaking News

सांगोला तालुक्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ८२.६३ टक्के शांततेने मतदान झाले

सांगोला तालुक्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ८२.६३ टक्के शांततेने मतदान झाले


सांगोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 21 मतदान केंद्रावर ५ हजार ५७८ स्त्री मतदारांनी तर 6 हजार १५९ पुरुष मतदारांनी एकूण ११ हजार 737 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ८२.६३ टक्के शांततेने मतदान झाले

बलवडी येथे अकरा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने सरपंच पदासाठी १ हजार २४८ स्त्री तर १ हजार ४३९ पुरुष व एकूण २ हजार ६८७ मतदारांनी मतदान केले एकूण ७६.२३ टक्के मतदान झाले

चिंचोली ग्रामपंचायत मध्ये 11 जागेसाठी १ हजार २३८ स्त्री व १ हजार ३८९ पुरुष असे २ हजार 627 मतदारांनी मतदान केले एकूण ८७.१३ टक्के मतदान झाले

शिवने ग्रामपंचायत मध्ये 11 जागेसाठी १ हजार ४०५ स्त्री व १ हजार ५५७ पुरुष असे २ हजार ९६२ मतदारांनी मतदान केले एकूण ८९.७३ टक्के मतदान झाले

चिनके ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली होती ११ सदस्य पदासाठी १०६६ स्त्री तर १०९१ पुरुष असे २ हजार १५७ मतदारांनी मतदान केले एकूण ८१.४६ टक्के मतदान झाले

अनकढाळ ग्रामपंचायत मध्ये नऊ जागा असून तीन जागेवर बिनविरोध निवड झाली होती उर्वरित सहा जागेसाठी ६२१ स्त्री तर ६८३ पुरुष असे १ हजार ३०४ मतदारांनी मतदान केले एकूण ७५.९९ टक्के टक्के मतदान झाले

पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पॅनेल प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी मतदारांना आणून मतदान करून घेतले जात होते मतदारात उत्साह कमी दिसून येत होता परंतु नेत्यांनी घरी जाऊन मतदारांना प्रवृत्त केल्याने ८२ . 83 टक्के मतदान झाले किरकोळ शिवीगाळ प्रकरण सोडले तर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही 

सर्वत्र शांततेने मतदान पार पडले मतमोजणी मंगळवार वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे सरपंच निवडणूक प्रत्यक्ष मतदारातून असल्याने उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे तर कार्यकर्त्यांनी त्यासाठी मोठ्या पैजा लावल्या आहेत

Post a Comment

0 Comments