दुर्दैवी घटना... सांगोला- अज्ञात कारची दुचाकीस पाठीमागून धडक...
दचाकीस्वार ठार तर महिला गंभीर जखमी
सांगोला (तालुका प्रतिनिधी) भरधाव कारने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार तर महिला जखमी झाली आहे
असल्याची घटना रविवार दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास सांगोला मिरज रोड वरील गोडसेवाडी येथे घडली आहे श्रीकांत दिगंबर मिसाळ वय 55 रा. चिणके ता. सांगोला असे अपघातात मरणपावलेल्या इसमाचे नाव होय तर भाग्यश्री शंकर माने वय 65 महिला गंभीर जखमी झाली आहे.
श्रीकांत मिसाळ हे रविवार दि. 18 रोजी साडेचार वा.च्या सुमारास एम. एच. 10 ए.एन. 2457 या दुचाकीवरून चिणके ता. सांगोला येथून सांगोला कडे निघाले असता अज्ञात भरधाव चार चाकी वाहनाने दुचाकीस जोराची धडकदिल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत मिसाळ हे गंभीर जखमी होऊन मरण पावले
तर भाग्यश्री माने ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत सदर अपघात झाल्यानंतर भरधाव कार अपघातस्थळी न थांबता तसेच निघून गेले असल्याची घटना घडली आहे याबाबत नवनाथ शिवाजी मिसाळ यांनी अज्ञात कार चालकां विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
0 Comments