google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे बनावट पासपोर्ट हस्तगत

Breaking News

अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे बनावट पासपोर्ट हस्तगत

 अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे बनावट पासपोर्ट हस्तगत   

पोलिसांनी तीन विदेशी सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. या गुन्हेगारांच्या ताब्यातून तीन हजार अमेरिकन डॉलर्स, १. ३ मिलियनचे बनावट अमेरिकन डॉलर आणि १० हजार ५०० पौंड जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच आरोपींकडून अभिनेत्री ऐश्वर्या रायचे बनावट पासपोर्ट, सहा मोबाईल, ११ सिम, लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राईव्ह आणि ३ कार जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सराईत गुन्हेगार त्यांच्या साथीदारांसह सायबर गुन्हे करायचे. फेसबुक फ्रेंड बनवून कस्टम ऑफिसर बनून लोकांची फसवणूक करून ते सायबर गुन्हे करीत होते. या गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन बीटा-२ च्या निवृत्त कर्नलला टार्गेट केले. कॅन्सरचे औषध मिळवून देण्याच्या नावाखाली १ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे कर्नलने तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केली.

इके उफेरेमवुकवे, एडविन कॉलिन्स आणि ओकोलोई डॅमियन अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रेटर नोएडातील रामपूर मार्केटजवळ पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपी बड्या सेलिब्रिटींचे बनावट पासपोर्टही बनवत होते. हे सराईत गुन्हेगार देशाच्या विविध भागात सायबर गुन्हे करायचे. पोलिसांनी सांगितले की, हे गुन्हेगार मॅट्रिमोनिअल साइट, डेटिंग अॅप अशा अनेक प्रकारच्या घटनांमध्ये लोकांना अडकवत होते.

Post a Comment

0 Comments