सोलापूर: फोटो व्हायरलची धमकी देऊन महिलेवर बलात्कार , आरोपीकडून दीड किलो सोने व रोकड जप्त
सोलापूर - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱया आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने फोटो व्हायरलची धमकी देत सोने व रोकड लंपास केली होती. पोलिसांनी आरोपीकडून दीड किलो सोने व 50 हजारांची रोकड जप्त केली आहे. श्रीधर निवास रच्चा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.दाजीपेठ येथे राहणारा आरोपी श्रीधर रच्चा (वय 32) याची सोशल मीडियावरून एका विवाहित महिलेशी ओळख झाली होती.
या ओळखीतून त्याने वेळोवेळी महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला व तिच्याकडून व्यवसायासाठी म्हणून रोख रक्कम व दागिने घेतले. दरम्यान, त्याने महिलेकडे फॅक्टरी सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. यातून वाद सुरू झाला. विवाहितेने कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांत फिर्याद दिली.


0 Comments