ओमिक्रॉनच्या सर्वात धोकादायक व्हेरियंटची भारतात एन्ट्री; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण
गुजरातः नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असतानाच देशात करोनाचे सावट आहे. चीनसह जगभरात करोनाचा हाहाकार सुरू असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला व्हेरियंट XBB1.5चा रुग्ण भारतात सापडला आहे. भारतीय सार्स कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या अहवालानुसार डिसेंबरमध्येच हा व्हेरियंट भारतात सापडला आहे. गुजरातमध्ये याचा पहिला रुग्ण सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात bf.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. त्यातच आता XBB1.5 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याच व्हेरियंटमुळं न्यूयॉर्कमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती.
XBB व्हेरियंट बीए.२.१०.१ आणि बीए.२.७५ चं म्युटेशन आहे. हा व्हेरियंटचा भारतासह जगभरातील ३४ अन्य देशात फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या जातकुळीतील हा सर्वात धोकादायक व्हेरियंट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


0 Comments