सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना निलंबनाची नोटीस सीईओ दिलीप स्वामी
सोलापूर प्रतिनिधी :केंद्र शासनाच्या महाआवास, जलजीवन दिलीप स्वामी मिशन, स्वच्छ भारत मिशन यामध्ये सांगोला तालुक्याची असलेली सुमार कामगिरी, वारंवार सांगूनही कामात सुधारणा होत नसल्याने सांगोला पंचायत समितीचे आहे. गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही नोटीस बजावली असून सात दिवसांमध्ये खुलासा मागविण्यात आला आहे.
सीईओ स्वामी यांच्या कारवाईच्या तडाख्यात आतापर्यंत वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी सापडत होते. आता वर्ग एकचे अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी सीईओ स्वामी यांनी पावले उचलली आहेत. एका मुख्याध्यापकासह व तीन उपशिक्षकांना आज निलंबित करण्यात आले आहे.
पांडे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक विलास हनुमंत ओहोळ व प्रवीण कृष्णात घाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. शाळेत वांरवार गैरहजर राहणे, वारंवार रजेवर व विनापरवाना गैरहजर राहून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आढावा बैठकीत या संदर्भातील कारवाईची सूचना केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत अचानक भेट दिली होती.
येथील मुख्याध्यापक बसवराज कोळी व उपशिक्षक सतीश राठोड यांच्या संदर्भात सरपंच, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
” कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या जात होत्या. त्यातून संबंधित व्यक्तीचे नुकसान टाळावे अशी भावना होती परंतु या सूचनांना काही जण फारसे गांभिर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता निलंबनाची कारवाई अथवा सेवा पुस्तकात थेट शेरे लिहिण्याची कारवाई सुरू केली आहे. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी मिळणार
सोलापूर जिल्ह्याला प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रभारी आहेत. जिल्ह्यातील ११ पैकी ८ तालुक्यांमध्ये प्रभारी गट शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण विभागातील या पदांवर पूर्णवेळ अधिकारी असावेत यासाठी जिल्ह्याला किमान ८ गट शिक्षणाधिकारी द्यावेत, अशी मागणी सीईओ स्वामी यांनी सचिवांकडे केली आहे. लवकरच जिल्ह्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळतील असा विश्वास सीईओ स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments