google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक!पोटच्या पोरानेच केला आईचा खुन,खुन केला एका ठिकाणी उलगडा झाला दुस-या ठिकाणी

Breaking News

धक्कादायक!पोटच्या पोरानेच केला आईचा खुन,खुन केला एका ठिकाणी उलगडा झाला दुस-या ठिकाणी

 धक्कादायक!पोटच्या पोरानेच केला आईचा खुन,खुन केला एका ठिकाणी उलगडा झाला दुस-या ठिकाणी 

मुंबईतील जुहू येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादात पोटच्या पोराने वृद्ध आईची निर्घृण हत्या केली आहे. बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर वार करत आईची हत्या केल्यावर मुलाने मृतदेह माथेरानच्या  दरीत फेकून दिला.या प्रकरणी नेरळ पोलिसांना महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीणा गोवर्धनदास कपूर (वय वर्ष ७४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सचिन कपूर असे आरोपी मुलाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती समजल्यावर जुहू पोलीस, माथेरान पोलीस आणि नेरळ पोलीसांनी सदर महिलेचा मृतदेह शोधून दरीतून बाहेर काढला आहे. काल बुधवारी रात्री हे शोधकार्य पूर्ण झालं. तसेच पुढील तपासासाठी मृतदेह मुंबईला पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा आणि त्यांचा मुलगा सचिन या दोघांमध्ये ६ डिसेंबर रोजी जोरदार भांडण झाले होते. संपत्तीच्या कारणावरून दोघांचा वाद वाढला. सचिनला आईचा खुप राग आला. त्यामुळे त्याने नोकराच्या मदतीने आईची हत्या करण्याचा कट रचला.

घरात कोणी नसताना त्या दोघांनी आधी वीणा यांचे हात पाय बांधले. त्यानंतर बॅटने त्यांच्यावर हल्ला केला. नराधम मुलाने आईला बॅटने खुप मारहाण केली. या मारहाणीमुळे त्यांचा जीव गेला. आईचा मृत्यू झाल्यावर आपण पकडले जाऊनये यासाठी त्यांनी पुरावे नष्ट केले.

 यासाठी सर्वात आधी त्यांनी एक मोठा बॉक्स घेतला. त्यामध्ये आईचा मृतदेह ठेवला. कोणालाही काही समजू नये यासाठी त्यांनी तो बॉक्स एकदम नीट पॅक केला. त्यानंतर त्यांनी मृतदेह माथेरानच्या एका दरीत फेकून दिला.

जुहू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित कुमार वर्तक यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, सचिन कपूर ६ डिसेंबर रोजी आई बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन आला होता. त्यावेळी पोलिसांनी  सर्वात आधी त्याची चौकशी केली. 

त्याच्या बोलण्यातून संशय आल्याने पोलिसांनी कपूर यांच्या जुहू येथील घरात तपास केला. त्यावेळी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागले. यात सचिन आणि आणखीन एक मुलगा मोठा बॉक्स घेऊन कुठे तरी जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि सचिनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला.

Post a Comment

0 Comments