google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली १०१२ आणि नव्याने

Breaking News

विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली १०१२ आणि नव्याने

विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली १०१२ आणि नव्याने

निर्माण करण्यात आलेली ३११० या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसुल विभाकडुन सुरु करण्यात आली असुन प्रत्येक विभागीय आयुक्तांकडुन जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास
शासनाने सुचीत केले आहे. महसुल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्यस्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना
मिळणाऱ्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरुन नवीन सजे निर्माण करुन त्यांचीही भरती करण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती.
या सर्व बाबींचा विचार करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होते. त्यांच्या समस्या एेकल्यानंतर आता
राज्यातील रिक्त असलेल्या तलाठ्यांची भरती प्रक्रीया १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करून राबवण्याच्या सुचना मंत्री विखे-पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार आता
राज्यातील महसुली विभागातील नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची भरती लवकरच

सुरु होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही महसुल विभाकडुन सुरु करण्यात आली असुन प्रत्येक विभागीय आयुक्तांकडुन जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सुचीत केले आहे.

Post a Comment

0 Comments