चर्चा तर होणारचं ! दूध विक्रीसाठी मराठमोळ्या माणसाने खरेदी केलं
30 कोटी रुपयांच हेलिकॉप्टर ; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा
भारत हा शेतीप्रधान देश. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. आपल्या देशात शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय प्रामुख्याने केले जातात. विशेष म्हणजे शेतीपूरक व्यवसायातून व्यवसायिक चांगली कमाई करत आहेत.
आज आपण अशाच एका मराठमोळ्या दूध व्यावसायिकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या दुधाच्या व्यवसायासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केल आहे. यामुळे सध्या या अवलियाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. जनार्दन भोईर असे या दुधव्यवसायिकाचं नाव आहे.
जनार्दन हे भिवंडी या ठिकाणी राहतात. एका मीडिया रिपोर्ट नुसार, जनार्दन हे शेतीसोबतच रियल इस्टेट या क्षेत्रात काम करतात. मात्र त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. दुधाच्या व्यवसायात त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. त्यांच्या दुधाच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना अनेकदा परराज्यात जावं लागतं.
हरियाणा, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यात त्यांचा कायम दौरा असतो. विदेशवारी देखील त्यांना अनेकदा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने करावी लागते. अशा परिस्थितीत त्यांना अनेकदा परराज्यात किंवा विदेशात वेळेवर पोहोचता येत नसत. यामुळे त्यांची हेळसांड होत असे. परिणामी त्यांनी यावर तोडगा म्हणून हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
आणि मग 30 कोटी रुपये खर्चून एक प्रायव्हेट हेलिकॉप्टर खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या अडीच एकर जमिनीत एक प्रायव्हेट हेलीपॅड देखील तयार केलं. त्या शेजारी पायलेटसाठी आणि टेक्निशियनसाठी एक रूम उभारली. निश्चितच भोईर यांनी भारत हा खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश का म्हणून ओळखला जातो याचे उदाहरण सेट केलं आहे.


0 Comments