google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अहो आश्चर्यम्ऽऽ !सोलापुरात 106 वर्षाच्या आजीला पुन्हा आले दुधाचे दात

Breaking News

अहो आश्चर्यम्ऽऽ !सोलापुरात 106 वर्षाच्या आजीला पुन्हा आले दुधाचे दात

 अहो आश्चर्यम्ऽऽ !सोलापुरात 106 वर्षाच्या आजीला पुन्हा आले दुधाचे दात

सोलापूर - वार्धक्याची चाहूल लागताच दात पडायला सुरुवात होते. एकदा पडलेले दात पुन्हा येणे केवळ अशक्य आहे. मात्र सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात चपळगांव येथे आश्चर्यजनक घटना घडली आहे. सोलापुरात वयाच्या 106 व्या वर्षी एका आजींना पुन्हा दात आले. धानव्वा उटगे असे या आजींचे नाव आहे.

विशेष म्हणजे आजींचे हे दात दुधाचे आहेत. दुधाचे दात परत आल्यामुळे घरात जणू आनंदाचे वातावरण होते.

दुधाचे दात परतले म्हणून घरातील सदस्यांनी आजीचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यासाठी पाळणा सजवला आणि एखाद्या बाळा प्रमाणे आजींना टोपी घालून फुलांचा हार घातला आणि बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमा प्रमाणे आजींना पाळण्यात घातले. बाळा जो जो रे म्हणत पाळण्याला झोका देत चक्क बारशाचा कार्यक्रम केला.

 धंनव्वा आजी या 106 वर्षाच्या असून गेल्या 40 वर्षांपासून एकदा जेवतात आणि दररोज सकाळी योगा करतात. त्यांची जीवनशैली चांगली असल्यामुळे त्या तब्बेतीने धड धाकडं असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 106 व्या वर्षी आजींना परत दुधाचे दात आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments