google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात रात्रगस्तीवर पोलिसांनी दुचाकी थांबवली पन्नास किलो चंदनासह तिघांना पकडले सांगोल्यात कारवाई : दोघांनी अंधारात पळ काढला

Breaking News

सांगोला शहरात रात्रगस्तीवर पोलिसांनी दुचाकी थांबवली पन्नास किलो चंदनासह तिघांना पकडले सांगोल्यात कारवाई : दोघांनी अंधारात पळ काढला

सांगोला शहरात रात्रगस्तीवर पोलिसांनी दुचाकी थांबवली पन्नास किलो चंदनासह तिघांना पकडले 

सांगोल्यात कारवाई : दोघांनी अंधारात पळ काढला

सांगोला : रात्रगस्तीवरील पोलिसांनी संशयावरून भरधाव दुचाकी पकडली. त्याची झडती घेतली असता ५० किलो चंदनाचे पाच ऑडके आणि कुदळसह दुचाकी पकडली.ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास पंढरपूर- सांगोला रोडवर नवीन बाह्यवळणाजवळ पोलिसांनी केली.

 कारवाईदरम्यान दुचाकीवरील विशाल अशोक जाधव (वय २० रा. गणपती मंदिरजवळ, महूद रोड, सांगोला) यास ताब्यात घेतले तर प्रसन्न महादेव घोंगडे (रा. घोंगडे वस्ती एखतपूर रोड, सांगोला) व कुणाल सुरेश मंडले (रा. नायकुडे वस्ती, सांगोला)असे दोघेजण पळून गेले. याबाबत, पोलीस नाईक धनंजय अवताडे यांनी फिर्याद दिली आहे.

 पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास क्षीरसागर, असलम काझी, बापूसाहेब झोळ, पोलीस नाईक धनंजय अवताडे, तुकाराम व्हरे, 

घुले, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार या पथकाने बुधवारी रात्री ११ वाजता सांगोला शहरात रात्रगस्तीवर असताना कारवाई केली. गस्तीदरम्यान हे पथक सांगोला नवीन बायपास ब्रिजजवळ आले असता मंगळवेढा रोडने दुचाकीवर तिघेजणबसून मध्यभागी पांढऱ्या पोत्यात काहीतरी घेऊन भरधाव वेगाने जाताना दिसले. 

संशय आल्याने पोलीसांनी त्यांना दुचाकी थांबविण्यास सांगितले. त्यावेळी अंधारात दुचाकीवरील दोघे पळून गेले तर एकास पकडले. चौकशीत पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता लाकडाचे ओंडके व त्याला चंदनासारखा वास येत होता. लाकडाचे ओंडके कुठून आणले विचारले असता त्यांने वाढेगाव येथून आणल्याचे सांगितले.

 यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एम. एच. ४५/ के. ३६६५), ५० किलो चंदनासह एक कुदळ असा मुद्देमाल जप्त केला.

Post a Comment

0 Comments