सांगोला शहरातील सुप्रसिद्ध भोसले हॉस्पिटलचे सर्वेसर्वा
डॉ. शिवराज भोसले यांचे वडील रामदास भोसले गुरुजी (आण्णा) यांचे दुःखद निधन
सांगोला ( प्रतिनिधी) श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे संस्थापक व सांगोला तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तालुकाध्यक्ष, रामदास भोसले गुरुजी (आण्णा) धायटी यांचे शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायं. 6 वा. सुमारास पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 83 वर्ष होते.
सांगोला शहरातील सुप्रसिद्ध भोसले हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. शिवराज भोसले तसेच संजय भोसले सर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 2 मुली यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे. सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद व इतर अनेक सामाजिक संघटनात ते सक्रिय होते.
रविवार दिनांक 27 रोजी सकाळी 7 वा. 30 मी. धायटी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


0 Comments