‘या’ तारखेला ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत निवडणूक आयोगात होणार सुनावणी!
मुंबई: ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. १२ डिसेंबर २०२२ ला ही सुनावणी होणार आहे.
या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार आहेत.दरम्यान, दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करणार आहेत.
त्यामुळे एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.


0 Comments