सांगोला राजकारणात टिका टिपण्णी..वाद-विवादामध्ये महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये..
डॉ भाई बाबासाहेब देशमुख
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी पहावयास मिळत आहेत.संपुर्ण राज्यांमध्ये गावागावात राजकारणातील घडामोडी एकमेकांवरती होत असलेली सडकुन टिका..
काही वेळेस पातळी सोडून बोलणे आशा गोष्टीची चर्चा रंगताना पहावयास मिळत आहे. यामध्ये राजकारणात टिका-टिपण्णी वाद-विवादामध्ये महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होता असे मत शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक नेते होउन गेले आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठीचे फार मोठे योगदान दिले आहे..अशा नेत्यांमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातुन अकरा वेळा निवडून आलेले भाई गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी एकाच पक्षातुन अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेआहे.
त्यांनी शेतकरी, कष्टकरी,कामगार यांच्या प्रश्नांसाठी सतत सभागृहात आवाज उठवला व त्यांच्या प्रश्न सोडवुन घेतले.. राज्यातील पाणी प्रश्नावर त्यांचा दांडगा अभ्यास होता..सांगोला तालुक्यात टेंभु म्हैसाळ योजनेचे पाणी आणून त्यांनी इतीहास घडवला आहे
तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पंढरपूर वरुन चंद्रभागेचे पाणी आणुन पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला त्यांनी आपली आमदारकी जनतेसाठी पणाला लावली व एवढ्या प्रदीर्घ काळात कोणावरती वयक्तीक टिका टिपण्णी कधीही केली नाही..
आजची राजकीय परिस्थीती वेगळी निर्माण झाली आहे..अनेक नेते एकमेकांवर ती अगदी खालच्या थराला जाऊन टिका करीत आहेत.एवढी टिका करतात कि टिकेची पातळी अतिशय खालच्या थराला गेलेली पहावयास मिळत आहे…
काही नेते तर महिला नेत्यांवरती खालच्या थराला जाऊन बोलताना पहावयास मिळत आहेत.तसेच टिका टिपण्णी करताना अक्षरशः सवाल जवाब पहावयास मिळत असतो आज बोलले की उदया लगेचच तिखट प्रतीक्रिया येते तीही अगदी ताबडतोब असा सामना रोजचाच पहावयास मिळताना दिसत आहे.
संवीधानीक पदावरती आसताना आपली जबाबदारी आणखीन वाढते कायद्याच्या चौकटीत राहुन वर्तन व बोलणे ठेवावे लागते आकस भावाने द्वेषाने वागायचे व बोलणार नाही अशी शपथ घेतलेली आसताना…हे नेते अगदी चुकीचे बोलतातच कसे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.राजकीय नेते हे त्या त्या भागातील अथवा मतदार संघातील लोका़चे प्रेरणा स्थान असायला हवे त्यांच्याकडे पाहुन युवा पिढी निर्माण व्हायला हवी.
एवढे त्या नेत्याचे कार्य निष्कलंक,चारित्र्य संपन्न,जनतेप्रती निष्ठा असलेले असायलाच हवे. परंतु आता बहुतांश पक्षातील नेते हे टिका टिपण्णी करण्यासाठी नेमलेत का असे वाटायला लागले आहे.एक काळ आसा होता निवडणुक लागली की भाषणांमध्ये एकमेकावरती टिका केली
जायची तीही मर्यादेत राहुन आता तसे नाही खालच्या स्तराची टिका सध्या नित्याचीच झाली आहे..कुठलाही कार्यक्रम असो तीथे विरोधकांवरती बोलल्याशिवाय तो कार्यक्रमच होत नाही.लोकांनाही आशा गोष्टीची सवय झाली की काय अशी भिती वाटु लागली आहे…
अहो राज्यात सध्या येवढे प्रश्न महत्त्वाचे व निकडीचे आहेत त्याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जात आहे..राज्यात रोजगार निर्माण होत नाहीत.
जे होतात ते बेकार तरुणांच्या संख्येने अत्यंत कमी निर्माण होत आहेत.शिक्षण तर बिना पैशाचे राहीलेच नाही..शिक्षणाचा बाजार झाला आहे.लहान व्यवसाय तर अडचणीत सापडलेत.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर सारेच नेते जिव तोडुन बोलत असतात आंम्ही सुध्दा शेतकरी आहोत आंम्ही शेतकरयांचे तारणहार आहोत आशा आविर्भावात वागत असतात
परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरयांना जवळुन पहा..मग त्या शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात येईल.. अक्षरशः कोलमडुन पडला आमचा शेतकरी बांधव.काही शेतकऱ्यांच्या शेतात पिके कशी बशी आली ती बाजारता घेऊन गेल्यावरती खर्चा पेक्षा कमी पैसे हातात येत असतील
तर शेतकरी ताठ मानेने उभा राहीला कसा…हमी भाव मिळाला पाहीजे ही सर्वांचीच मागणी आहे परंतु त्यावरती ठोस असे उपाय योजना करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
असे अनेक प्रश्न महत्त्वाचे असताना ते सोडवणे गरजेचे असताना हे नेते रोजच टिका टिपण्णी…आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत…
राजकारण हे समाजकारणाचे प्रमुख माध्यम आहे.राजकारणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे.हा विकास साधत असताना फक्त समाजाचे हित लक्षात ठेवले तर बस झाले..कशाला आरोप प्रत्यारोप करत बसायचे.तुमच्या बोलण्याच्या वागण्याचा प्रचार एका क्षणात सर्वत्र होत असतो.हे सर्व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवले गेले पाहिजे.
राजकारणात दिर्घ काळ राहुन जनतेची सेवा करायची असेल तर स्व आबासाहेबांच्या कार्याचा ,वागण्याचा , बोलण्याचा व संसदीय कामकागाजाचा अभ्यास केला व त्यांचे अनुकरण काही प्रमाणात जरी आत्मसात केले तर राजकीय व सामाजीक क्षेत्रात आपले नाव दिर्घ काळ घेतले जाईल…
नाहीतर आज वारे माप प्रसिध्दी व काही दिवसांतच त्या नेत्यांचा विसर होतानाची अनेक उदाहरणे आहेत… सर्वांनी राजकारणात काही मर्यादा स्वताला घालुन घेतल्या पाहिजेत.राजकारणात विचार भिन्नता असु शकते मात्र मनभिन्नता आसता कामा नये.आशा वर्तनामुळे टिका टिपण्णी..पराकोटीचे वाद विवाद निर्माण होतात
व महत्वाचे प्रश्न बाजुला आपोआप फेकले जाणार नाहीत याची दक्षता माझ्या सहित सर्व नेतेमंडळींनी घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाची उंची आणखीन वाढेल असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.


0 Comments