मंगळवेढ्यातील एम आय डी सी 'त्या' बेपत्ता अल्पवयीन मुलाची माहिती देणाऱ्यास मिळणार 50 हजार; पोलीस प्रशासनाकडून बक्षीस जाहीर
मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून दि.18 नोव्हेंबरपासून चार वर्षीय मुलगा खेळत असताना बेपत्ता झाला आहे.
रणवीरकुमार मनोजकुमार साहू असे या मुलाचे नाव असून याची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
कोणास सापडल्यास मंगळवेढा पोलीस ठाणे फोन नंबर 02188 220333 रणजित माने पोलीस निरीक्षक, मंगळवेढा 9822227585या नंबर वरती संपर्क साधावा
वय ०४ वर्षे, ०२ महिने, ०६ दिवस, रंग-निमगोरा, उंची ३ फुट अंदाजे, चेहरा-गोल, अंगात नेसणस-पांढऱ्या रंगाचा टि शर्ट व काळे रंगाची हाफ पॅन्ट, दोन्ही पायात काळा दोरा बांधलेला,
जखमा-उजव्या पायाच्या गुडघ्यावर व अंगठ्यावर जखमेचे निशान, भाषा - हिंदी, स्वत:चे नाव विचारल्यास दाऊ असे सांगतो व माता का नाम लताबाई असे सांगतो, पिताजी का नाम मनोजकुमार असे स्पष्ट बोलतो, नाक सरळ, डोळे - मध्यम अशा वर्णनाचा तो मुलगा आहे.
दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विविध 9 पोलिस अधिकारी पथकाव्दारे जिल्हयाच्या कानाकोपर्यासह अन्य राज्यात वेगाने सर्व बाजूने तपास सुरु आहे.
दि.18 रोजी सायंकाळी 6.00 वा. यातील अल्पवयीन मुलगा रणवीरकुमार साहू हा मंगळवेढा एम.आय.डी.सी.च्या समोर असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
या घटनेला सहा दिवस उलटून गेले आहेत. या घटनेमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी जवळपास 20 नातेवाईकांचे फ्रिंगर प्रिंटस घेतल्याचे सांगण्यात आले. याच परिसरात त्या मुलाचा जेवणाचा डबा पोलिसांना मिळून आल्याने तो ताब्यात घेतला असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेनंतर पोलिस पथकाने एम.आय.डी.सी.परिसर तसेच परिसरातील ऊसाचे फड, विहिरी,कॅनॉल आदी ठिकाणांची कसून तपासणी केली, मात्र तो बालक कुठेही मिळून आला नाही.
पोलिस या घटनेनंतर अधिकच गंभीर झाले असून एकंदरीत 9 पोलिस अधिकार्यांची विविध पथके तपासासाठी कार्यरत आहेत. यामध्ये सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक तसेच डी.वाय.एस.पी.कार्यालयातील एक पथक,स्थानिक डी.बी.पथक त्याचबरोबर
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने,सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे,अमोल बामणे,बापू पिंगळे,अंकुश वाघमोडे या अधिकार्यांसह पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख,पोलिस शिपाई सुरज देशमुख,
पोलिस हवालदार प्रविण साळुंखे,सुनिल गायकवाड आदी अधिकारी व पोलिस कर्मचारी या घटनेत सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.या मुलाच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचे श्वान पथक आले होते. हे श्वान पथक एम.आय.डी.सी.परिसर व त्यांच्या घराकडेच घुटमळल्याचे सांगण्यात आले.
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने हे ग्राम सुरक्षा यंत्रणेव्दारे नागरिकांना सातत्याने कॉल करून या मुलाबाबत माहिती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करीत आहेत.
हि पथके जिल्हयाच्या कानाकोपर्यासह शेजारच्या तालुक्यामध्ये व बाहेरच्या राज्यामध्ये रात्रीचा दिवस करून त्या मुलाचा कसून शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.


0 Comments