google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत सरपंच , सदस्य पदासाठी किमान सातवी पास शिक्षणाची अट ?

Breaking News

ग्रामपंचायत सरपंच , सदस्य पदासाठी किमान सातवी पास शिक्षणाची अट ?

 ग्रामपंचायत सरपंच , सदस्य  पदासाठी किमान सातवी पास शिक्षणाची अट ?

सरपंच व्हायचंय ...तर ७ वी पासचा दाखला हवा .. ! ७ पासच्या अटीचा फटका , भावी सरपंचांच्या उत्साहावर विरजण !

सांगोला तालुका प्रतिनिधी ; सांगोला  तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे . दुसऱ्या दिवशी चिणके व शिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाले आहेत . 

थेट निवडणुकीतून सरपंच होता येत असल्याने अनेकजण शड्डू ठोकून मैदानात उतरलेले आहेत . तसेच सदस्य होण्यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत . ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गावकी आणि भावकीत शह कटशहाचे राजकारण सुरू आहे .

 सरपंचपदाच्या माध्यमातून आपल्याच  गावाचा कारभार हाती ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे . दरम्यान , ग्रामपंचायतीचा सरपंच , सदस्य हा किमान सातवी पास असावा , अशी निवडणूक विभागाची अट असल्यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे . 

निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे अंगठे बहाद्दरांची अडचण झाली आहे . सांगोला तालुक्यातील चिंचोली, चिणके , अनकढाळ , शिवणे , पाचेगांव खु . , बलवडी या सहा ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे .

 ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत किवा शेड्युल बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागेल .

 त्यामुळे स्वतंत्र खाते उघडण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे . ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे , तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे . यामुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

यावेळी थेट जनतेतून सरपंचपद निवडून येणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे . मात्र , थेट सरपंच व सदस्य पदासाठी किमान  सातवी पास ही अट असल्याने काहींच्या उत्साहावर मात्र पाणी फेरले गेले आहे . 

निवडणुकीत सरपंच व सदस्यपदाची निवडणूक लढविणारा उमेदवार १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आला असेल तर तो किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . याशिवाय थेट सरपंच म्हणून निवडून आलेला उमेदवार हा पदसिद्ध सदस्य असल्याने सदस्यांसाठी असलेली सातवी पास ही अट त्यांनाही लागू लागू राहणार

 असल्याचे निवडणूक विभागाने निर्देशित केले आहे . उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना जन्मतारखेचा व शैक्षणिक पात्रतेचा पुरावा जोडावा लागणार आहे . दरम्यान , गावागावांत निवडणुकीचीच चर्चा सध्या रंगताना दिसत आहे .

Post a Comment

0 Comments