मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू!
बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला होता.
याप्रकरणी मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना या व्यक्तीचा मृत्यू हर्ट अटॅकने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मोलकरणच्या पती आणि भावाने ६७ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून ६७ वर्षीय व्यावसायिकाचे मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. मोलकरणीच्या घरी कुणी नसताना ते अनेकदा तिथे जात होते. नेहमीप्रमाणे यावेळीही मोलकरणीच्या घरी कुणी नसल्याने ते तिच्या घरी गेले होते. मात्र यावेळी शरीरसंबंध ठेवताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे जागीच निधन झाले.
त्यानंतर मोलकरणीने पती आणि तिच्या भावाला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगर येथील निर्जन भागात फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी सर्व चौकशी केली असता मोलकरणीने वस्तूस्थितीची कल्पना देत सत्य परिस्थिती सर्वाना सांगितली.


0 Comments