google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पेट्रोल घेवून निघालेल्या टँकर आणि ऊसाच्या ट्रॉलीची जोरदार धडक दहा वाहने जळाली ... चालकाचा होरपळून मृत्यू !

Breaking News

पेट्रोल घेवून निघालेल्या टँकर आणि ऊसाच्या ट्रॉलीची जोरदार धडक दहा वाहने जळाली ... चालकाचा होरपळून मृत्यू !

 पेट्रोल घेवून निघालेल्या टँकर आणि ऊसाच्या ट्रॉलीची जोरदार धडक दहा वाहने जळाली ... चालकाचा होरपळून मृत्यू !

 एका अपघाताने तब्बल दहा वाहनांना आग लागली आणि ही सगळी वाहने जळून खाक झाली, यात राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसचा देखील समावेश आहे, एकाचा मात्र यात होरपळून मृत्यू झाला आहे. 

अलीकडे अपघात रोजच होत आहेत आणि या अपघातांचे प्रकार देखील वेगळे आहेत. अनेक अपघात आश्चर्य निर्माण करणारे असतात तर काही अपघात हे जबरदस्त धक्का देणारेही असतात. अपघात झालेल्या वाहनांचे नुकसान होते

 आणि काही जीवितहानी देखील होते परंतू लातूरच्या भातंगळी पाटीच्या जवळ झालेल्या एका विचित्र अपघातात तब्बल दहा वाहनांना आग लागली आणि या आगीत दहाही वाहने जळून खाक झाली. भातखेडा पुलाजवळ झालेल्या या अपघाताने प्रचंड विनाश केला आहे आणि तितकाच मोठा धक्का देखील दिला आहे. 

पेट्रोल घेवून निघालेल्या टँकर आणि ऊसाच्या ट्रॉलीची जोरदार धडक झाली पण याची झळ रस्त्यावरील तब्बल दहा वाहनांना लागली.  ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोज अपघात करीत रस्त्याने सुसाट सुटलेले आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून ट्रॅक्टरकडून होणारे अपघात दरवर्षीच वाढत असतात.

 यावर्षीही राज्यात सगळीकडे हे यमदूत लोकांचा जीव घेत सुटलेले आहेत. हा अपघात देखील यातीलच एक प्रकार आहे. पुन्हा एकदा उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली आणि चक्क पेट्रोलचा टँकर पेटला आणि त्याने सोबतची दहा वाहने जाळून टाकली.   

ट्रॅक्टर आणि पेट्रोल वाहून नेत असलेल्या टँकर यांच्यात अपघात झाला आणि टँकरमधील पेट्रोल रस्त्यावर सांडू लागले. पेट्रोलसारखा ज्यालाग्राही पदार्थ रस्त्यावर सांडल्यावर विनाश घडणार हे उघडच आहे. पेट्रोल सांडू लागले असतानाच संपूर्ण टँकरनेच पेट घेतला आणि या आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावू लागल्या. भयानक परिस्थिती निर्माण झाली 

असतानाच या आगीने रस्त्यावरील अन्य वाहनांना देखील लपेटले आणि रस्त्यावरील तब्बल दहा वाहने आगीत लपेटली गेली. विशेष म्हणजे या आगीत राज्य परिवहन महामंडळाची एक बस देखील पेटली. प्रवाशांना घेऊन निघालेल्या या बसला देखील आग लागली आणि सर्वच्या सर्व दहा वाहने जळून खाक झाली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी होते परंतु आगीच्या घटनेवेळी वेळीच सर्व प्रवाशी एस टी बाहेर पडले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली गेली. अत्यंत थरारक प्रसंग निर्माण झाला असतानाही प्रवाशी सुदैवाने बचावले. टँकर चालकाचा मात्र या आगीत होरपळून मृत्यू झाला तर अन्य चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. 

मांजरा नदीच्या पुलाच्या  पूर्वेस उड्डाण  असल्यामुळे वाहतूक एकाच सर्व्हिस मार्गावरून सुरु आहे. या रस्त्यावरून लातूरकडून नांदेडच्या दिशेने पेट्रोल घेऊन निघालेला टँकर चालला असताना ऊसाच्या ट्रॉलीने टँकरला जोराची धडक दिली. 

या धडकेमुळे टँकर लीक झाला आणि त्यातून पेट्रोल बाहेर पडून लागले. उताराच्या बाजूने पेट्रोल रस्त्यावर सांडले. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. वाहने जागीच उभी असताना टँकरची आग भडकली आणि ती उभ्या वाहनांना देखील लागली.

 रांगेत उभ्या असलेल्या वाहनात कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक, एस टी, ऊस वाहतूक करणारी वाहने आणि दोन कार देखील होत्या. ही सगळी वाहने पेटली आणि जागेवरच जळून खाक झाली. आजूबाजूच्या गावातील नागरिक मदतीसाठी धावले आणि त्यांनी प्रवाशांस तातडीने आगीपासून दूर नेले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.  

होरपळून मृत्यू !

पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरने एकदम पेट घेतल्यामुळे टँकर चालक गफार इस्माईल शेख याना टँकरमधून खाली उतरण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आहे. अन्य वाहनातील चार जण या आगीत जखमी झाले आहेत . जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूकडे निघालेल्या कापसाच्या ट्रकला आग लागल्याने ५५ लाख रुपयांच्या कापसासह ट्रक जाळून खाक झाला आहे. 

प्रवासी बचावले !

राज्य परिवहन महामंडळाची एक बस प्रवासी घेऊन निघाली होती आणि ही बस देखील आगीची शिकार झाली आहे. या बस मधून २५ ते ३० प्रवासी प्रवास करीत होते. पेटलेल्या टँकरपासून जवळच ही बस उभी होती आणि  या बसच्या खालच्या बाजूला आगीने वेढले होते, अशा परिस्थितीत घाई करून प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यात आले त्यामुळे या प्रवाशांचा जीव बचावला आहे.

Post a Comment

0 Comments