दिघंची येथील युवकाची गळफासाने आत्महत्या
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील १७ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली. वैभव अरविंद पुसावळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैभव अरविंद पुसावळे (वय १७ वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याने झाडाच्या फांदीस गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
आज सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी ही घटना त्याचा चुलता देवेंद्र श्रीरंग पुसावळे यांच्या घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेतला. याबाबत त्यांनी फोनवरून आटपाडी पोलिसांना खबर दिली. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


0 Comments