google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जुन्या नोटा बाहेर काढा, बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?

Breaking News

जुन्या नोटा बाहेर काढा, बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?

 जुन्या नोटा बाहेर काढा, बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?

नोटाबंदीवेळी बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार? वाचा काय आहे नेमका प्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर करून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या. आता यावर पुन्हा चर्चा सुरू आहे.

मुंबई,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर करून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या. या जुन्या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात नव्या नोटा घेण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतही दिली होती. ही मुदत 2017मध्ये संपली. 

जुन्या नोटा बंद केल्यानंतर 500 व 2000 रुपयांची नवीन नोट आणण्यात आली, तर 1000 रुपयांच्या नोटा कायमच्या बंद करण्यात आल्या. बंद झालेल्या 500-1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलता येणार असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

देशातल्या नोटाबंदीच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (25 नोव्हेंबर 2022) सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी झाली. 

त्यावेळी न्यायमूर्ती एसए नजीर यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं जुन्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत विचार करणार असल्याचे संकेत दिले; मात्र काही विशेष प्रकरणांमध्येच असं करण्यास परवानगी दिली जाईल. आता या प्रकरणी पुढची सुनावणी 5 डिसेंबर 2022 ला होणार आहे.

Post a Comment

0 Comments