सोलापूर जिल्ह्यातील अतिक्रमण पडणार पण कोणती? पालकमंत्री विखे पाटलांकडून दिलासा कुणाला वाचा
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण येत्या 31 डिसेंबर अखेर सक्तीने काढा. गरज पडल्यास तहसीलदार व पोलीस प्रशासनाची मदत घ्या अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.
याविषयावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शासकीय व गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे.
गायरान जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेतून राहण्याची घरे आहेत किंवा साधारण पाचशे स्क्वेअर फुटावर घरे बांधण्यात आले आहेत ती अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
दरम्यान ऑक्टोबर 2022 रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली करण्यात आली की राज्य सरकारने गायरान अतिक्रमणाबाबत काय कार्यवाही केली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण दोन लाख 22 हजार 153 अतिक्रमित घरे आहेत. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किती घरे बसतात ते अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत
असे उच्च न्यायालयात आम्ही मांडणार आहे त्यामुळे अशा लोकांना संरक्षण मिळेल मात्र जे व्यापारी गोडाऊन गायरान जमिनीवर बांधण्यात आले आहेत त्यांची घाई केली जाणार नाही ती मात्र पाडली जाणार अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली. पहा पालकमंत्री काय म्हणाले,


0 Comments