google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळे-बोधगिरे वस्ती पोलिसांनी घेतला सुटकेचा निःश्वास घरफोडीत चोरीला गेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने पाण्याच्या बादलीतील काळ्या पिशवीत सापडले

Breaking News

सांगोला कोळे-बोधगिरे वस्ती पोलिसांनी घेतला सुटकेचा निःश्वास घरफोडीत चोरीला गेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने पाण्याच्या बादलीतील काळ्या पिशवीत सापडले

 सांगोला कोळे-बोधगिरे वस्ती पोलिसांनी घेतला सुटकेचा निःश्वास

घरफोडीत चोरीला गेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने पाण्याच्या बादलीतील काळ्या पिशवीत सापडले

सांगोला : कोळे-बोधगिरे वस्ती येथील घरफोडी घटनेत चोरीला गेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने फिर्यादीच्या घरासमोरील पाण्याच्या बादलीत काळ्या पिशवीत मिळाले. यामुळे फिर्यादी महिलेसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास घेतला. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सोने ताब्यात घेतले.

 पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोने फिर्यादीच्या ताब्यात दिले जाणार आहे, परंतु सोने मिळाले असले तरी गुन्ह्याचा तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.

 चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लॉकर व किचनमधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे १९ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा करदोडा, रोख ५ हजार असा ५ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना

 २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान कोळे (ता. सांगोला) येथील बोधगिरे वस्ती येथे घडली होती. याबाबत वंदना आलदर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, 

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सोलापूर येथून श्वान पथक मागवले होते. तर ठसे तज्ज्ञांना बोलावून फिंगरप्रिंट घेतले. 

पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे वेगाने हलवली. असे असताना सोमवारी फिर्यादी वंदना आलदर यांची सून काजल सकाळी ६ वाजता घरासमोर झाडलोट करून सडा टाकण्यासाठी बादली

 घेतेवेळी बादलीत काळी पिशवी दिसली म्हणून तिने पिशवी उघडून पाहिली. यावेळी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मिळून आल्याने सासू-सुनेच्या आनंदाला पारावर उरला नाही. वंदना आलदर यांनी सोने सापडल्याचे पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांना सांगितले.

Post a Comment

0 Comments