सांगोला गौडवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी राजाभाऊ गुळीग यांची बिनविरोध निवड
गौडवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी निवडणूक आज दुपारी 2 वाजता सरपंच सौ.सुजाता अप्पासो माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या निवडणुकीमध्ये राजाभाऊ गुळीग यांची बिनविरोध निवड झाली.
या वेळी निवडणूक अधिकारी फुले साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती सांगोला,ग्रामसेवक सौ. वलेकर मॅडम ,सरपंच सौ.सुजाता अप्पासो माळी, मा. उपसरपंच पोपट गडदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव अलदर, भाऊसो गडदे, विकास गडदे, रत्नाबई शिंगाडे,अनिता सुनील वाघमोडे, अनिता तानाजी वाघमोडे, राधाबाई कांबळे,अशा बनसोडे इ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या वेळी सोपान शिंगाडे, माणिकराव सकट,महेश माळी,समाधान भंडारे,विजय चोरमुले, जितेंद्र गुळीग, लक्ष्मण आवटे, विशाल गुळीग,दत्ता गडदे, अशोक कांबळे, दशरथ गुळीग, शशी हातेकर, व गावातील इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.


0 Comments