स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा लांबणीवर, दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे.
या प्रकरणाची सुनावणी आता दोन आठवड्यानंतर घेणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रशासक नेमून सहा महिने उलटले तरी निवडणुकांबाबत प्राथमिकता सुप्रीम कोर्टाच्या अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट झालं.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पहिल्यांदा पाच आठवड्याची स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुनावणीस आलंच नाही. दसरा सुट्टीमुळे ही सुनावणी घेण्यात आली नव्हती. आज पुन्हा यावर सुनावणी न होता ते दोन आठवडे लांबणीवर गेलं आहे.


0 Comments