google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजून केली आत्महत्या

Breaking News

कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजून केली आत्महत्या

 कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजून केली आत्महत्या

कर्जाचा डोंगर आणि आर्थिक चणचणीला कंटाळून एका ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या आपल्या परिवारासह जीवन संपवल्याची दुःखद घटना मुंबईतील गोवंडी भागात घडली आहे.

कर्जबाजारी झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या करत, स्वत:ही आत्महत्या केली आहे. मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी येथील ही दुर्देवी घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोवंडी येथील इंदीरानगर झोपडपट्टी भागात ही घटना घडली. शकिल जलील खान (३४), रजीया शकिल खान (२८), सर्फराज शकिल खान(५), आतिका शकिल खान(३) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. हे कुटुंब चाळ नं १३, फैजाने रजा मस्जीदचे मागे रोड नं १४, गोवंडी – मंबई येथे राहत होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारी असलेल्या शकिलने २९ सप्टेंबरला शीतपेयातून आपल्या पत्नी आणि मुलांना विष दिले. हे शीतपेय प्यायल्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला. सर्वांचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर शकिलने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कर्जाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments