google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचा सज्जड दम; महाराष्ट्रात गोव्यातून दारू आणल्यास मोक्का अंतर्गत कारवाई होणार

Breaking News

राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचा सज्जड दम; महाराष्ट्रात गोव्यातून दारू आणल्यास मोक्का अंतर्गत कारवाई होणार

 राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचा सज्जड दम; महाराष्ट्रात गोव्यातून दारू आणल्यास मोक्का अंतर्गत कारवाई होणार

मुंबई : राज्यातून अनेक जण पर्यटनासाठी वर्षभर गोवा येथे ये-जा करत असतात यामध्ये अनेकजण पर्यटनासोबतच काही विशेष हेतूने गोव्याची वारी करत असतात यामध्ये गोव्यातून दारू आणणे हे देखील विशेष प्रयोजन असते. जे राज्यातील नागरिक यापुढे गोवा येथून महाराष्ट्रात दारूची वाहतूक करतील त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचनावजा इशारा दिला आहे.

 यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, जी व्यक्ती तीनदा गोवा राज्यातून दारूची वाहतुक महाराष्ट्रात करताना दोषी आढळली तिच्यावर मोक्का अंतर्गत यापुढे कारवाई करण्यात येईल. राज्यातील सिंधुदुर्ग व कोल्हापूर मार्गे अनेकवेळा मद्यप्रेमी गोवा येथून महाराष्ट्रात दारू आणतात, त्यामुळे या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना विशेष कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे.

अनेकदा अवैधरित्या गोवा राज्यातून दारूची महाराष्ट्रात तस्करी करण्यात येते त्यामुळे याप्रकरणी जातीने लक्ष घालत मंत्री शंभूराज देसाई यांनी मद्यप्रेमींना मोक्का कारवाईचा सज्जड दम दिला आहे. याबाबतीत स्पष्टीकरण देताना शंभूराज देसाई म्हणाले की, गोवा येथील दारू विक्रीचे परमिट हे तिथल्या पुरते मर्यादित आहे व महाराष्ट्र राज्यात दारूचे परमिट हे महाराष्ट्र शासनाची अंतर्गत बाब असल्याने तेथून महाराष्ट्रात दारू आणणे हा गुन्हा असून, यापुढे अशा प्रकरणी एकच व्यक्ती तीनदा दोषी आढळला तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल.

सध्या या बाबतीत कसून तपासणी करिता चेक पॉईंट्स लावण्यात येणार असून, यामुळे येत्या काळात अवैधरित्या होणाऱ्या दारूच्या तस्करीला देखील आळा बसणार आहे.

Post a Comment

0 Comments