google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गावातले नेतेच करताहेत अडवणूक; गटा-तटामुळे जातोय विकासाचा बळी २८ ग्रामपंचायतींना नोटिसा : ग्रामसेवक, सरपंचावर होणार कारवाई

Breaking News

गावातले नेतेच करताहेत अडवणूक; गटा-तटामुळे जातोय विकासाचा बळी २८ ग्रामपंचायतींना नोटिसा : ग्रामसेवक, सरपंचावर होणार कारवाई

गावातले नेतेच करताहेत अडवणूक; गटा-तटामुळे जातोय विकासाचा बळी २८ ग्रामपंचायतींना नोटिसा : ग्रामसेवक, सरपंचावर होणार कारवाई

 सोलापूर गावामध्ये विकास

 कामांसाठी निधी येतो. तो खर्च न करता अडवणुकीचे राजकारण केले जाते. एखादा गट चांगले काम करत असेल तर दुसरा गट अडवणुकीचे राजकारण करतो. त्यामुळे निधी खर्चायचा राहत असून, गावातील विकास मात्र थांबला आहे. निधी खर्च न झाल्यामुळे जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींना नोटिसा देण्यात आल्या असून ग्रामसेवक, सरपंचावर कारवाई होणार आहे.

 अनेकदा सरपंच जागेवर असत नसती आठवड्यातून एकदा गावात येणे, नामधारी सरपंच असणे, कारभार वेगळ्याच माणसाच्या हातात असणे, अशा कारणांमुळे निधी खर्चायचा राहतो. अनेकदा आमदार एका पक्षाचा तर गावात दुसऱ्या पक्षाचे वर्चस्व असल्यामुळेही विकास कामे होत नाहीत.

 जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतीनी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी निधी खर्च केल्याने बार्शी, करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, पंढरपूर या सहा गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. येत्या काळात पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च न झाल्यास गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतींना दीडशे कोटींचा निधी मिळाला

 गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने २०२०-२१ मध्ये ग्रामपंचायत स्तरावर २२१ कोटी, २०२१-२२ मध्ये २५२ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतीना देण्यात आला होता... परंतु यातील २८ ग्रामपंचायतीनी निधी खर्च केला नाही.सरपंच, ग्रामसेवकांवर होणार कारवाई

 जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीनी २५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च न केल्याने पंढरपूर, उत्तर सोलापूर मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी आणि वाशी येथील गटविकास अधिकारी याना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीचा निधी का खर्च झाला नाही. याविषयी माहिती अहवाल पाठविण्याच्या सूचना बीडीओ याना देण्यात आल्या आहेत.ही कामे झाली असती

 गावामध्ये पाणी पुरवठा, वीज पंप व पाणी योजनाची दुरुस्ती करणे सिमेंट काँक्रीट रस्ते, शाळा खोली दुरुस्ती, बदिस्त गटार, आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राना साहित्य पुरविणे, आरोग्य शिबिरे घेणे, शाळेला शैक्षणिक साहित्य पुरविणे ही अनेक कामे करण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले होते. तरीही जिल्हातील ग्रामपंचायतीनी निधी खर्च केला नाही.

 २० ग्रामपंचायतींनी एकही पैसा नाही खर्चला

 पंधराव्या वित्त आयोगाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना निधी देण्यात आला होता. २८ ग्रामपंचायतीनी शून्य टक्के निधी खर्च केला आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीना नोटिसा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईसाचिन शेळके यानी दिली.

Post a Comment

0 Comments