google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजापूरला जाताय का? जाणून घ्या ७ ते १० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक मार्गातील बदल

Breaking News

तुळजापूरला जाताय का? जाणून घ्या ७ ते १० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक मार्गातील बदल

 तुळजापूरला जाताय का? जाणून घ्या ७ ते १० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक मार्गातील बदल

कोजागिरी व मंदिर पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे ९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा व १० ऑक्टोबरला मंदिर पोर्णिमा असल्याने त्या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्यासंबंधीचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले आहेत.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील व कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणावर तुळजापूरकडे पायी चालत जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शुक्रवारी (ता. ७) पासून १० ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे. तुळजापूर-सोलापूर या मार्गावरील वाहनांसाठी तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. 

तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहनांना तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या मार्गावरून प्रवास करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तरीपण, पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन व अत्यावश्यक सेवेतील वाहने, एस.टी. बस, या वाहनांसाठी हा आदेश बंधनकारक नाही. ७ ते १० ऑक्टोबर या काळात तुळजापूर घाट हा वाहतुकीस बंद राहील, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

वाहनांसाठी पर्यायी मार्ग...

तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतूक मंगरुळपाटी हटकल, बोरामणी असा प्रवास करतील. तर सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक बोरामणी, इटकळ मंगरुळपाटी मार्गे जाईल. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुक तुळजापूर, उस्मानाबाद, पैराम, बार्शी मार्गे आणि बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहने बार्शी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे ये-जा करतील.

Post a Comment

0 Comments