google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आईने नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाने आत्महत्या, बारामती तालुक्यातील मधील धक्कादायक घटना

Breaking News

आईने नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाने आत्महत्या, बारामती तालुक्यातील मधील धक्कादायक घटना

 आईने नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाने आत्महत्या, बारामती तालुक्यातील मधील धक्कादायक घटना 

जीवनयात्रा संपविली

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून बारामती तालुक्यातल्या क-हावागज मधील एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.या घटनेने खळबळ माजली आहे.

शुभम मोतीराम धोत्रे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम चे वडील वारले आहेत आणि त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता.

 पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

मृत शुभम इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. त्याने केवळ मोबाईलच्या हट्टापायी आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments