महापौर किशोरी पेडणेकर ह्यांनी डॉ. प्रविण निचत ह्यांचा भारत श्री २०२२ पुरस्काराने सन्मानित केले
डॉ. प्रविण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. त्यांचे बदलापूर येथे शतायुषी निसर्ग उपचार केंद्र असून ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत
टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या ह्या निसस्वार्थ कार्याची दखल महाराष्ट्र न्युज १८ चॅनेल ने घेतली.
ह्या वेळी महापौर किशोरी पेडणेकर, उदघाटक अभिजीत राणे समारंभाध्यक्ष डॉ . पावन अग्रवाल, माझी नगरसेवक उपेंद्र सावंत, चंद्रकांत निर्भवने तर प्रमुकग उपस्तीथी सिनेकलाकार कल्याणी तापसी उपस्थिती होत्या.
कार्यक्रम कामगार कल्याण भवन विक्रोळी, मुंबई संपन्न झाला. ह्या वेळी किशोरी ताई व सिनेकलाकार कल्याणी तापसी ह्यांनी सन्मान चिन्न व प्रशिस्त पत्रक देऊन डॉ प्रवीण निचत ह्यांना सन्मानित करून, कौतुक केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


0 Comments