शहीद अशोक कामटे संघटनेच्या
वतीने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन.
सांगोला: (प्रतिनिधी) सांगोला शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे भव्य किल्ले स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी दिली.
सांगोला शहर व तालुक्यातील लहान मुले किल्ला बनवितात दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावी हि धडपड सातत्याने असते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण विश्व तलावावर ज्ञात असून येणाऱ्या पुढच्या पिढीला गडकिल्ल्यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे येणार आहे या करिता शहीद अशोक कामठे संघटना अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवत असते.
प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीत किल्ले बांधणी ,किल्ले सजावट स्पर्धा 2022 करिता सहभागी स्पर्धकांनी करिता नाव नोंदणी दिनांक 24 ऑक्टोंबर 2022पर्यंत शिंदे मशिनरी स्टोअर्स, स्टेशन रोड सांगोला या ठिकाणी करावी. अधिक माहितीसाठी चारुदत्त खडतरे- 7887522929 , एडवोकेट हर्षवर्धन चव्हाण 9657755050 यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेचे नियम व अटी संघटनेच्या कार्यालयात स्पर्धकांना पहावयास मिळतील. सर्वाधिक स्पर्धकांनी किल्ले, गड तयार करून शिवकालीन इतिहास जागृत ठेवावा .त्यामुळे येणाऱ्या पुढील करता तो नक्कीच स्फूर्तीदायक असेल या उद्देशाने शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना संदेश देते. उत्कृष्ट किल्ले करणाऱ्यांना पारितोषिक देऊन शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे.



0 Comments