गर्भवती महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या जत तालुक्यातील घटना...
दोन चिमुकल्या मुलांसह गर्भवती आईचा विहिरीत मृतदेह सापडला आहेत.या मध्ये एक वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.
सांगली - दोन चिमुकल्या मुलांसह गर्भवती आईचे विहिरीत मृतदेह सापडला आहेत. या मध्ये एक वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जत तालुक्यातील सिंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तर आपल्या चिमुरड्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केले आहे.
महिलेची दोन मुलांसह आत्महत्या - जत तालुक्यातल्या सिंदूर या गावांमध्ये कर्नाटक सीमेवर शेतामध्ये असणाऱ्या विहिरीत एका तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने आपल्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडीला आहे.
लक्ष्मी धानेशा माडग्याळ,वय- 23,दिव्या धानेशा माडग्याळ,वय-02 श्रीशैल्य धानेशा माडग्याळ,वय -01 असे मृतांची नावे आहेत. लक्ष्मी हिचे पाच वर्षांपूर्वी नात्यातल्या एका तरुणाशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर लक्ष्मी हीने धानेशा माडग्याळ सोबत पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. त्यानंतर दोघांना दोन अपत्ये होती. तर लक्ष्मी हे सध्या तीन महिन्याची गर्भवती होती.
दरम्यान, रविवारी सायंकाळी लक्ष्मी आपल्या मुलांच्या सोबत गायब असल्याचा निदर्शनास आल्यानंतर त्याचा शोध घेतला असता शेतातल्या विहिरीमध्ये लक्ष्मी व त्याच्या दोन वर्षीय मुलीचे मृतदेह तरंगत असताना आढळून आले,त्यानंतर घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेत आईसह दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.तर धानेशा आणि लक्ष्मी यांच्यामध्ये होणाऱ्या कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय,
तर हे आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.याप्रकरणी जत पोलीसांनी घटनेची नोंद करत या आत्महत्या आहे की ? घातपात ? या दृष्टीने तपास सुरू केला आहे.


0 Comments