google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिंचोली, पाचेगाव खु.,अनकढाळ, शिवणे, बलवडी, चिणके या ग्रामपंचायतीची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर दिनांक 18/10/2022 पर्यंत तहसील कार्यालयात हरकती स्वीकारनेत येणार आहेत

Breaking News

चिंचोली, पाचेगाव खु.,अनकढाळ, शिवणे, बलवडी, चिणके या ग्रामपंचायतीची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर दिनांक 18/10/2022 पर्यंत तहसील कार्यालयात हरकती स्वीकारनेत येणार आहेत

  चिंचोली,पाचेगाव खु.,अनकढाळ,शिवणे,बलवडी, चिणके या ग्रामपंचायतीची मतदार यादी प्रसिद्ध झाली

 असून त्यावर
 दिनांक 18/10/2022 पर्यंत तहसील कार्यालयात हरकती स्वीकारनेत येणार आहेत तहसीलदार अभिजीत सावर्डे पाटील

सांगोला ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम.. जाहीर 

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.. राज्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. या निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १२ नुसार ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे आवश्यक आहे. 

याकरीता दिनांक ३१/०५/2022 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरायची आहे. आयोगाच्या दिनांक ०४/१०/२०२२ च्या सुधारीत अधिसूचनेन्वये दिनांक ३१/०५/२०२२ हा दिनांक अधिसूचित करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे मुद्दा क्र. २ नुसार प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्यात येत आहे -

मतदार यादी कार्यक्रमाची व्याप्ती राज्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दिनांक ३१/०५/२०२२ रोजी प्रसिध्द केलेली

 महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात यावी. या निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे मतदार याद्या तयार करण्यात याव्यात. त्यासाठी दिनांक १२/१०/२०२२ पर्यंत मतदार याद्या download करुन त्यांचे printout काढून प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात याव्यात .मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील.

 मतदार यादी प्राडा धरण्याचा दिनांक

 मंगळवार दिनांक ३१/०५/२०२२

 १) प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक

 २) हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी

३३ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गुरुवार दिनांक १३/१०/२०२२

 गुरुवार दिनांक १३/१०/२०२२ ते मंगळवार दिनांक १८/१०/२०२२ पर्यंत (शनिवार दिनांक १५/१०/२०२२ रोजी हरकती स्वीकारण्यात याव्यात शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२

 प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर त्या ग्रामपंचायतींच्या नावासह (मराठी /इंग्रजी) प्रसिध्दी अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे तात्काळ न चुकता सादर करण्यात यावा.

 प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणे

 प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना पुढील बाबींची खात्री करुन घ्यावी.

 विधानसभा मतदार यादीत संबंधित ग्रामपंचायतीचा समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या अधिक त्या ग्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे 

म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभेच्या मतदार यादीत समाविष्ट असलेले सर्व मतदार त्या ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदार त्यामध्ये समाविष्ट झाले नाहीत याची खात्री करावी.. या मतदार ओ स्थलांतरीत मतदारांच्या बाबतीत  कार्यवाही करावी.

 विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बदल करण्याचे जसे की, नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरूस्ती व पत्त्यांमधील दुरूस्ती करणे इत्यादींबाबतची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही, याची कृपया नौद घ्यावी. प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे. यादीवर मतदार / नागरीकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रारूप मतदार यादीला दिनांक १३/१०/२०२२ रोजी व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करणे दि.१३/१०/२०२२ ते दि.१८/१०/२०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करण्यात यावी. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर फक्त पुढीलप्रमाणे सुधारणा / दुरुस्ती करता येईल लेखनिकांच्या काही चुका दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार  संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली 

असल्यास अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करणे. सदर मतदार यादी कार्यक्रमानुसार विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांवर वरीलप्रमाणे विचार करून त्यानुसार आवश्यक त्याच सुधारणा मतदार यादीत कराव्यात जेणेकरून पुढील काळात याबाबत न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे:

 अंतिम मतदार याचा अधिनियमातील तरतुदीनुसार अधिप्रमाणित करून त्याबाबतची सूचना दि.२१/१०/२०२२ रोजी मुद्दा क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या पध्दतीने प्रसिद्ध करण्यात यावी. मतदार यादी अंतिम करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हदीबाहेरील मतदारांची नावे अंतर्भुत न करण्याबाबत आयोगाच्या दिनांक ०२/१२/२०२० च्या आदेशानुसार दक्षता घ्यावी. प्रारूप व अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीस खालीलप्रमाणे व्यापक प्रसिध्दी द्यावी जसे

 ग्रामपंचायत तलाठी सजा, मंडळ अधिकारी, पंचायत समिती व तहसिल  कार्यालयातील सूचना फलकावर

स्थानिक वृत्तपत्रे स्थानिक केबल टि. व्ही.

 वरील सूचनाप्रमाणे आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात विभाजन विहित मुदतीत व बिनचूक करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील. (संदर्भ: शासनाच्या महसूल व वन विभागाचे दि.२४/०४/२०१७ रोजीचे परिपत्रक) मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एखादया ग्रामपंचायतीबाबत मा. न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास त्या ठिकाणचा मतदार यादी कार्यक्रम रद करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकान्यांच्या स्वाक्षरीने आयोगास तात्काळ सादर करावा. 

मतदार यादी कार्यक्रमाच्या टप्प्यावर प्रत्यक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी व इतर यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करावी व त्याचा अहवाल तत्परतेने आयोगास ई-मेलद्वारेच सादर करण्यात यावा. आपल्या कामाचा आढावा मा. आयुक्त यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेळोवेळी घेण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी,

 राज्यात उद्भवलेल्या कोवीन १२ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक उपाययोजनाबाबत आयोगाने दिनांक /०५/२०२२ दिलेल्या आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,

 तसेच केंद्र व राज्य शासनाने कोबी १२ च्या अनुषंगाने वेळोवेळी जाहीर केलेल्या विविध उपाययोजना व दक्षता घेण्याबाबत दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे.मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने निर्धारीत केलेल्या कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावी.

Post a Comment

0 Comments