मंगळवेढ्यातील छ.शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सोमेश यावलकर यांची ५१ हजाराची देणगी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सामाजिक बांधिलकी जोपासत अहोरात्र जनसेवा करणारे सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन तथा सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी ५१ हजार रूपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या या कार्याचे मंगळवेढा शहर व तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
मंगळवेढा शहरात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम सुरू आहे.
यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी देगणी देत अश्वारुढ पुतळा उभारणीच्या कार्यात हातभार लावला आहे. सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन तथा सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनीही मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी ५१ हजार रूपयांची देणगी दिली आहे.
प्रत्येक सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी सदैव तत्पर राहून सामाजिक बांधिलकी जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सोमेश यावलकर यांची ओळख आहे. सोमेश यावलकर यांच्या कार्याचे मंगळवेढा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.


0 Comments