यंदा सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 96 हजार 757 रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड ; 100 रुपयात मिळणार किट
सोलापूर : शहर व जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. शासनाकडून यंदा दिवाळीसाठी अन्न सुरक्षा व अत्योदय तथा प्राधान्य कुठुंब कार्डधारकांना आता शासनाकडून दिवाळी भेट मिळणार आहे. नियमित धान्य सोडून आता प्रत्येक कार्डधारकांना रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी एक किलो तर पामतेलाचे एक लिटरचे पाकीट असा संच केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.
त्यामुळे यंदा कार्डधारकांची दिवाळी गोड होणार आहे.त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून जवळपास अन्न सुरक्षा आणि अत्योंदय कार्डधारकांसाठी जवळपास 3 लाख 96 हजार 757 किटची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अत्योंदय योजनेतली जवळपास 52 हजार 923 कार्डधारक आहेत तर प्राधान्य कुुठुंब योजनेतील 3 लाख 43 हजार 834 कार्डधारक आहेत.
त्या प्रत्येक कार्डावर आता नियमित मिळणारे धान्य सोडून प्रत्येक कार्डधारकाला 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि पामतेलाचे एक पाकीट असे जिन्नस असलेले किट देण्यात येणार आहे.यामुळे केवळ गहु आणि तादुंळ यावर दिवाळी साजरी करता येणार नाही
याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी सोलापूर जिल्ह्याकडून शासनाला मागणी कळविण्यात आली आहे.त्यामुळे येत्या चार पाच दिवसात गोडावुनला हे साहित्य दाखल होईल अशी मागणी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागविण्यात आलेले किट तालुका निहाय पुढीलप्रमाणे...
दिवाळीसाठी शंभर रुपयात चार जिन्नस लाभार्थ्यांना मिळणार आहेत.त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 3 लाख 96 हजार 757 किटची मागणी केली आहे. यामध्ये उत्तर सोलापूर - 14321, दक्षिण सोलापूर - 18095, मंद्रुप - 14255, अक्कलकोट - 29168, बार्शी - 32849, वैराग- 14903, मोहोळ - 30365, माढा - 9829, कुर्डुवाडी - 21358,टेंभुर्णी- 13364, करमाळा - 21995, जेऊर - 11729, पंढरपूर - 25174, अनवली - 16057, मंगळवेढा- 23794, सांगोला- 42978, माळशिरस - 20654, माळशिरस 1 - 21103, नातेपुते- 14766 एवढ्या किटची मागणी करण्यात आली आहे.
0 Comments