google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

Breaking News

वामनराव शिंदे प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

 वामनराव शिंदे प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

सांगोला( प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालय ,सांगोला व अजिंक्यतारा मल्टीकेअर हॉस्पिटल सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशालेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी दिली.

 या शिबिरात शहरातील नामांकित अजिंक्यतारा हॉस्पिटलचे डॉ अजिंक्य नष्टे व इतर तज्ञ डॉक्टर ,कर्मचारी हे रक्तदाब शुगर इंडोस्कोपी, पोटाचे विकार, शरीरातील रक्ताचे प्रमाण यासह विविध चाचणी करणार आहेत गरज पडल्यास मोफत उपचार हि केले जाणार आहे तरी या शिबिरात शहर व परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे .

 या शिबिराचे स्थळ 547 ,प्रशाला, चिंचोली रोड सांगोला . शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर 2022 वेळ सकाळी 8-11 तरी या शिबिरात सर्वांनी सहभाग सहभाग नोंदवावा असे आव्हान मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments