google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगारवाली महिलेला केली मारहाण...जत तालुक्यातील घटना..

Breaking News

मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगारवाली महिलेला केली मारहाण...जत तालुक्यातील घटना..

 मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगारवाली महिलेला केली मारहाण...जत तालुक्यातील घटना.. 

जत :  जत येथे मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगार गोळा करणाऱ्या एका महिलेला मारहाण केली आहे. या प्रकरणी जत पोलिसांनी चार महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जतच्या ताड वस्ती जुने गोडावून येथे महिला लहान मुलांना घेऊन जात असताना मिळून आल्याने तिला पकडून ठेवलं आणि झाडाला बांधलं. 

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला जमा झाल्या होत्या. यावेळी या महिलेला चार महिलांनी मारहाण केली. घटनास्थळी जत पोलीस दाखल झाले आणि सदर महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला जतच्या शेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले आणि भंगार गोळा करण्यासाठी आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तिला तिच्या गावी पाठवले आहे.

दरम्यान, जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मॅसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतुन हा प्रकार घडला आहे. मारहाण केलेल्या चार महिलांच्या विरोधात जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments