चक्क म्हशीने दिला पांढऱ्या शुभ्र पिल्लाला जन्म..
चंद्रपूर : म्हैस काळीकुट्ट असते. तीने जन्मास घातलेले पिल्लू तिच्यासारखेच. मात्र संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावातील संजय येलमुले यांच्या म्हैसीनं चक्क पांढरं शुभ्र पिल्याला शुक्रवारचा रात्री जन्म दिला. या पिल्याला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या पिल्याची शारीरिक स्थिती सुढृळ आहे. मात्र आज सकाळपासून हे पांढरं दूध पित नसल्याने येलमुले कुटूंबिय चिंताग्रस्त आहेत.
वग्यार असलेलं हे पिल्लू परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरलं आहे. या पिल्याला बघण्यासाठी नागरिक येलमुले यांचे घर गाठीत आहेत. मात्र आज सकाळपासून या पिल्याने दुधाला तोंड लावलेले नाही.
खाजगी पशु चिकीत्साकडून उपचार सूरू असल्याची माहीती संजय येलमुले यांनी दिली. संजय पंढरीनाथ येलमुले हे शेतकरी आहेत. शेतीपुरक व्यवसाय म्हणून ते म्हैस पालन करतात.त्यांचाकडे तीन म्हैस आहेत. या तीन म्हसी दररोज बारा लिटर दुध देतात. यातून येलमुले यांना महीण्याभरातून बारा हजार रूपयाची मिळकत होते.


0 Comments