google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बँक खात्यात अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये

Breaking News

बँक खात्यात अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये

 बँक खात्यात अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये

तुमच्या बँक खात्यात जर अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? असं अनेकदा अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. चुकीच्या बँक डिटेल्समुळे वेगळ्याच खात्यात पैसे जातात आणि ज्याच्या खात्यात हे पैसे येतात त्याची काही काळापुरती तरी भांबेरी उडते. असाच प्रकार घडला आहे अहमदाबादेत. एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यात तब्बल ११ हजार ६७७ कोटी रुपये अचानक जमा झाले.

बँकेच्या चुकीमुळे रमेश सागर यांच्या डिमॅट खात्यात ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले.

ते गेल्या सहा वर्षांपासून शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करत आहेत. २७ जुलै रोजी त्यांच्या डिमॅट खात्यात ११६,७७,२४,४३,२७७ एवढी रक्कम दिसू लागली. त्यांनी लगेच त्यातील २ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले.

त्या गुंतवणुकीवर त्यांना एका दिवसात पाच लाखांचा नफाही मिळाला. बँकेला त्यांची चूक लक्षात येताच, बँकेने ती रक्कम परत घेतली. मात्र, तोपर्यंत सागर यांना पाच लाखांचा नफा झाला होता. यामुळे बँकेने ११ हजार ६७७ कोटी रुपये परत घेतले असले तरीही तरुणाला पाच लाखांचा नफा झाला आहे.

Post a Comment

0 Comments