पवारांच्या सोलापूर दौऱ्याने पंढरपूर मतदार संघातील राष्ट्रवादीला बूस्टर डोस मिळणार का ?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीतील निसटत्या पराभवाने ढासळलेल्या बुरुजाला उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौय्राने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला बुस्टर डोस मिळणार काय ? असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामधून विचारला जात आहे.
राज्यात भाजपा सत्तेत असताना मंगळवेढा नगरपलिकेवर 2016 ला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाला.2019 च्या विधानसभा निवडणूकीत स्व भारत भालके यांच्या रुपाने राष्ट्रवादीला 10 वर्षानंतर आमदार मिळाला होता पण विठठल कारखान्याच्या व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी झालेल्या धावपळीत स्व. भारत भालकेच्या आजाराने डोके वर काढले त्यात त्यांचे निधन झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्याचे पुत्र भगीरथ भालके यांना निसटता पराभव स्विकारावा लागला.
मतदारसंघाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुर्ल केले राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादीला या मतदारसंघावर पकड कायम ठेवता येईना नुकताच राज्यात सत्ताबदल झाला त्यांचा फारसा परिणाम या मतदारसंघात झाला नाही मात्र राष्ट्रवादीचा पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर वाढू लागले.नुकत्याच झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणूकीत भालके गटाला परिचारक गटाचा आधार घ्यावा लागला कारखान्यावरील सत्ता मिळविली.
मतदारसंघात सध्या भोसे, आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत, आरोग्य विभागात मरवडे,आंधळगाव,बोराळे शवविच्छेदनाचा बोजवारा उडाला. पोस्टमार्टम रूम कडे दुर्लक्ष भोसे उपकेंद्रांतर्गत नुकतेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून आतडी बाहेर आल्याचा प्रकार घडला,दोष मात्र रस्त्यावरील खड्डेवर ढकलला. पावसाळ्यात विविध रोगराई रोखण्यासाठी फवारण्या,
रमाई घरकुल योजनेअंतर्गत रोजगार हमीच्या अनुदानापासून अनेक लाभार्थी वंचित,नवीन विहीरीच्या कामास सुरूवात नाही,बांधकाम विभाग अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, शिक्षण विभागातील 115 रिक्त शिक्षकांचा प्रश्न, एकात्मिक बालविकास अंतर्गत कुपोषण, पोषण आहार, पशुसंवर्धन विभागातील सध्या जनावरांना लंपी लसीची उपलब्धता,
राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादनाच्या मोबदल्यावर प्रहार संघटनेला एकाच मागणीसाठी दोन वेळा उपोषण करावी लागले मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न देखील सरकार दरबारी अडकला आहे. 15 हजार पेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक रेशनच्या मालापासून वंचित आहेत. कृषी पंपासाठी तालुक्यामध्ये अतिरिक्त ट्रान्स्फर च्या मागणीकडे महावितरण गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष केले आहे अनेक विभागातील प्रलंबित आहेत या प्रश्नावर रान ओटण्याची राष्ट्रवादीला संधी आहे
परंतु नेत्याच्या नेत्यासमोर दिसणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीत अधिक झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन कोण करणार हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करताना दिसत नाही किंबहुना त्या प्रश्नासाठी आंदोलन करतानाही दिसत नाही.सत्तेचा गुळ संपल्याने अनेक कार्यकर्त्यानी अंतरावर राहण्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली 2019 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीची बांधणी पवाराच्या सोलापूर दौय्राने झाली.
हा दौरा सोलापूरसह राज्यातील तरुणाला प्रेरणा देणारा ठरला सध्या जिल्हयात भाजपाचे लोकप्रतिनिधी जास्त असून केंद्रातील राज्यातील सत्तेचा लाभ घेताना आपला गटबांधणी नेटाने करत असताना राष्ट्रवादीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मात्र स्मशान शांतता आहे.त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा घडयाळाचा गजर वाजणे अडचणीचे ठरणार आहे
पंढरपूर विधानसभा मतदार संघात दामाजीच्या निवडणुकीनंतर मंगळवेढ्यातील बहुतांश राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशांत परिचारकांशी सलगी वाढवली तर पंढरपुरातील कार्यकर्ते आ. समाधान आवताडे यांच्याशी संपर्कात आहेत या मतदार संघाची जबाबदारी कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार यांच्याकडे दिली होती मात्र त्यांनी देखील या मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी अद्याप वेळ दिला नाही


0 Comments