google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद जवान संस्था सांगोला व वेदांत हॉस्पिटल तर्फे कडलास येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Breaking News

शहीद जवान संस्था सांगोला व वेदांत हॉस्पिटल तर्फे कडलास येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 शहीद जवान संस्था सांगोला व वेदांत हॉस्पिटल तर्फे कडलास येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 या शिबिरामध्ये 172रुगणांची मोफत तपासणी करण्यात आली.....

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त व वीर शहीद जवान संतोष गायकवाड यांच्या स्मृती पित्यर्थ कडलास येथे शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेदांत हॉस्पिटल सांगोला यांच्यावतीने दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

      सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने  वीर पत्नी दिपाली संतोष गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शहीद भगतसिंग व शहीद संतोष गायकवाड यांच्या प्रतिमेस कडलास गावचे सरपंच दिगंबर भजनावळे व निवृत्त मेजर मच्छिंद्र माने व मेजर अंबादास गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुखपसीमध्ये शहीद जवान संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव फुले हे होते 

त्यांनी आपल्या मनोगत मध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून वेदांत हॉस्पिटल सांगोला मोफत आरोग्य शिबीर योजनेचा रुग्णांनी लाभ घ्यावा व 15 ते 30 सप्टेंबर आरोग्य पंधरावा असल्याने व ग्रामीण भागातील रोगांची सोय व्हावी म्हणून काढलास येते हे मोफत शिबिर आयोजित केले आहे यापुढील काळात  रुग्णांनी वेदांत हॉस्पिटल येथे उपचार केल्यास 25% सूट देण्यात येणार आहे असे  सांगितले.

शिबिरासाठी डॉक्टर अक्षय मरगळे (अस्थिरोग तज्ञ), डॉक्टर निरंजन केदार (फिजिशियन) डॉक्टर विनायक डमकले (स्त्री रोग तज्ञ) डॉक्टर अण्णासौ लवटे (मॅनेजींग डायरेक्टर वेदांत हॉस्पिटल) डॉक्टर परेश खंडागळे (स्त्री रोग) तज्ञ डॉक्टर प्रमोद बोराडे (पॅथॉलॉजिस्ट )प्राध्यापक भारत गरंडे( पब्लिक रिलेशन ऑफिसर) डॉक्टर महावीर आलदर (बालरोग तज्ञ) डॉक्टर भोसले (मेडिकल ऑफिसर) डॉक्टर रवी मोरे (मेडिकल ऑफिसर) वरील सर्व डॉक्टरांनी सर्व रुग्णावर मोफत उपचार केले.

 या कार्यक्रमास माजी सरपंच द्वारकाताई गायकवाड युवा नेते दत्ता टापरे शहीद जवान संस्थेचे उपाध्यक्ष चैतन्य राऊत सचिव संतोष महिमकर खजिनदार महादेव दिवटे संजय गव्हाणे भारत वसेकर संदेश पलसे संदीप पाटणे सुधीर येल्पले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये वरील मान्यवर उपस्थितमध्ये शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये ए मेरे वतन के लोगो हे गीत सुधीर गायकवाड गुरुजी यांनी आपल्या मधुर आवाजात गायले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत गरंडे सर व आभार प्रदर्शन प्रदीप मिसाळ यांनी केले...

Post a Comment

0 Comments